शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा ड्रेसकोड राहणार कॉमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 22:57 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र ओळख दिसून यावी, या उद्देशाने या सत्रापासून विद्यार्थ्यांना मिळणारा गणवेश हा एकसारखा राहणार आहे.

ठळक मुद्देशिक्षण समितीचा निर्णय : अनारक्षित विद्यार्थ्यांनाही मिळणार गणवेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र ओळख दिसून यावी, या उद्देशाने या सत्रापासून विद्यार्थ्यांना मिळणारा गणवेश हा एकसारखा राहणार आहे. शिक्षण समितीने याला मान्यता दिली आहे. सोबतच ज्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत गणवेश मिळत नाही, त्या विद्यार्थ्यांनासुद्धा यंदा गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहे.पूर्वी जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खाकी आणि पांढरा तर विद्यार्थिनींसाठी निळा व पांढºया रंगाचा गणवेश असायचा. दरम्यान ठिकठिकाणी खासगी, इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू होऊ लागल्यात, खासगी शाळांतील विद्यार्थ्यांचा रंगीत गणवेश पालकांसह विद्यार्थ्यांनाही आकर्षित करू लागला. त्यामुळे जि.प.शाळांतील विद्यार्थी गळती सुरू झाली. गावपातळीवर शाळा व्यवस्थापन समिती अस्तित्वात आली आणि शासकीय अनुदानाबरोबरच या समितीला स्थानिक पातळीवर काही अधिकार मिळाले. या अधिकाराचा वापर करून काही प्राथमिक शाळांनी विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांसारखा गणवेश देण्यास प्रारंभ केला. यानंतर प्रत्येक शाळांचा गणवेश वेगवेगळा दिसू लागला. दरम्यान, स्पर्धा अथवा अन्य कारणांसाठी जि.प. शाळेतील विद्यार्थी एकत्र आल्यानंतर एकसारखेपणा दिसत नव्हता. शिक्षण सभापती भारती पाटील यांनी जि.प.च्या विद्यार्थ्यांचा ड्रेसकोड एक ठेवण्याची संकल्पना मांडली. त्याला सर्व समिती सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.समग्र शिक्षा अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पोषण आहार, पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. पण गणवेशाचे वितरण फक्त अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखाली असलेले विद्यार्थी व संपूर्ण विद्यार्थिनींना करण्यात येते. त्यामुळे ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश दिल्या जात नाही, त्यांच्यात न्यूनगंड तयार होतो. अशा विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पातून निधीची तरतूद करण्यात आली आहे.समितीने विद्यार्थ्यांच्या ड्रेसकोडचा रंग निश्चित केला आहे. त्यावर जिल्हा परिषदेचा लोगो राहणार आहे. गणवेशाचा निधी शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वळता करण्यात येत असल्यामुळे गणवेश कुठून खरेदी करायचा याचा अधिकार समितीला राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची वेगळी ओळख दिसून यावी, या उद्देशातून हा निर्णय घेतला आहे.भारती पाटील, शिक्षण सभापती, जि.प.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरSchoolशाळा