शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जिना मरना तेरे संग, मात्र... प्रेमीयुगुलाचे स्वप्न भंग!

By नरेश डोंगरे | Updated: June 26, 2025 22:35 IST

छत्तीसगडहून 'लव्ह एक्सप्रेस' सुसाट : नागपूर स्थानकावर 'रेड सिग्नल'

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : घर, समाज अन् वयाची तमा न बाळगता त्यांनी गाव सोडले. छत्तीसगडची ही सुसाट 'लव्ह एक्सप्रेस' राज्याची सिमा ओलांडून महाराष्ट्रात दाखल झाली. मात्र, नागपूर स्थानकावर तिला जीआरपीने 'रेड सिग्नल' दाखविला. त्यामुळे या प्रेमीयुगुलाची ताटातुट झाली. बुधवारी रात्री ही घटना उजेडात आली.

दुर्ग जिल्ह्यातील (छत्तीसगड) एका सधन घरातील १५ वर्षीय सपनाचे (नाव काल्पनिक) नात्यातील साजनसोबत (वय २४, नाव काल्पनिक) प्रेमसंबंध होते. साजन वयस्क असला तरी सपना मात्र अल्पवयीन असल्याने त्यांच्या लग्नात कायदेशिर अडथळा निर्माण झाला होता. कुटुंबीयच काय कायदाही आपल्या प्रेमसंबंधाला, लग्नाला परवानगी देणार नाही, याची त्यांना कल्पना होती. तरीदेखिल त्यांनी 'जिना मरना तेरे संग'च्या आणाभाका घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांनी 'चल कही दूर निकल जाये'चा निर्णय घेतला.

बुधवारी पळून जाण्याच्या तयारीने साजन आणि सजनी ट्रेन नंबर १८२३७ छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये बसले. ते गायब झाल्याचे कळाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानकावरचे सीसीटीव्ही चेक केले असता हे दोघे छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये बसून नागपूरकडे गेल्याचे दिसले. तोपर्यंत गाडी छत्तीसगडची सिमा ओलांडून नागपूरजवळ पोहचली होती.

परिणामी दुर्ग पोलिसांनी येथील रेल्वे पोलिसांना मेसेज दिला. त्यानुसार, रात्री ९.४५ च्या सुमारास नागपूर स्थानकावर तीन क्रमांकाच्या फलाटावर येताच जीआरपीचे सतिश बुराडे, जिचकार, रिता राऊत आणि सहकाऱ्यांनी गाडीची कसून तपासणी केली. एका कोचमध्ये हे प्रेमीयुगुल आढळल्यामुळे त्यांना लगेच खाली उतरवण्यात आले. या घडामोडीची माहिती दुर्ग पोलिसांच्या माध्यमातून मुलीच्या कुटुंबियांनाही कळविण्यात आली. त्यानुसार, ते नागपूरकडे येण्यासाठी निघाले.

घर बसवायचे, संसार थाटायचा...

दूर कुठे तरी जायचे आणि तेथे आपल्या स्वप्नाचे घर बसवायचे, संसार थाटायचा, अशी या दोघांची कल्पना होती. मात्र घर, गावच नव्हे तर प्रांतही सोडून पळून जात असलेल्या या प्रेमीयुगुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा स्वप्नभंग झाला आहे.

पालकांचा समंजसपणा, दोघांची घरवापसी

रात्रीची वेळ आणि मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी कायदेशिर औपचारिकता पार पाडून मुलीला काटोल मार्गावरील शासकीय वस्तीगृहात पाठविले. तर, प्रियकराला मात्र ताब्यात ठेवले. आज दोघांचेही पालक नागपुरात पोहचले. मुला-मुलींचे भवितव्य लक्षात घेता त्यांनी कोणतीही कारवाई करू नका, अशी विनवणी केली. ती मान्य करून रेल्वे पोलिसांनी त्यांची घरवापसी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी