शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

२०२२ पर्यंत प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण - हंसराज अहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 05:11 IST

प्रधानमंत्री आवास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून, यामुळे बेघर हा शब्द संपणार आहे. प्रत्येक भारतीयांचे घराचे स्वप्न या योजनेमुळे पूर्णत्वास येणार आहे, असे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.

नागपूर - प्रधानमंत्री आवास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून, यामुळे बेघर हा शब्द संपणार आहे. प्रत्येक भारतीयांचे घराचे स्वप्न या योजनेमुळे पूर्णत्वास येणार आहे, असे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत विभागात विविध उत्पन्न गटासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या १५१४ सदनिकांसाठी शनिवारी लक्ष्मीनगर चौकातील सांस्कृतिक सभागृहात आॅनलाईन सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी खा. डॉ. विकास महात्मे, म्हाडा नागपूर मंडळाचे सभापती तारिक कुरेशी, नागपूर मंडळाचे मुख्य अधिकारी संजय भिमनवार उपस्थित होते. या वेळी अहीर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच देशातील विषमता दूर करण्यासाठी या योजनेचे महत्त्व वादातीत आहे. आगामी काळात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अधिकाधिक घरे बांधण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळांतर्गत चंद्रपूर, हिंगणघाट व नागपूर येथील विविध उत्पन्न गटातील अर्जदारांकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागील वर्षी जुलै महिन्यात करण्यात आला होता. या योजनेंतर्गत विविध उत्पन्न गटातील १५५३ सदनिकांचे आॅनलाईन पद्धतीने सोडत काढून वाटप करण्यात आले. ही सोडत यू-ट्युबच्या माध्यमातून नागपूर हाऊसिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट बोर्ड २०१८ च्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे.नागपूर मंडळाने आतापर्यंत २५ हजार घरे बांधून १६ हजार भूखंड विकसित केले आहते. आगामी काळात नागपूर येथे १२ हजार २०० घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी संजय भिमनवार यांनी सांगितले.यावेळी गिरीश जोशी, सुनील साधवानी, प्रा. सुमित खत्री, विशाल गायकवाड, श्रीमती सलमा शेख तसेच सुनीलकुमार तिवारी हे पंच उपस्थित होते.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिरnagpurनागपूर