नाली बांधकाम आणि जोड रस्ता दुरुस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:18+5:302021-07-31T04:09:18+5:30
उमरेड : राष्ट्रीय महामार्ग ३५३-ई उमरेड ते मालेवाडा या दुहेरी सिमेंट मार्गाच्या बांधकामाबाबत अनेक तक्रारी पुढे येत आहेत. या ...

नाली बांधकाम आणि जोड रस्ता दुरुस्त करा
उमरेड : राष्ट्रीय महामार्ग ३५३-ई उमरेड ते मालेवाडा या दुहेरी सिमेंट मार्गाच्या बांधकामाबाबत अनेक तक्रारी पुढे येत आहेत. या मार्गावर करण्यात आलेले नाली बांधकाम आणि जोड रस्ते (अॅप्रोच रोड) याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट झाले. अनेक ठिकाणी रस्ते, नाली बांधकामास भेगा पडलेल्या असून, नालीचे बांधकाम वर आणि रस्ता खाली अशी परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून येत आहे. हे बांधकाम दुरुस्त करा, अशी मागणी नगरसेवक सतीश चौधरी, रोहित पारवे यांनी केली आहे.
उमरेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौक गिरड रोड ते ड्रिम सिटीपर्यंतच्या नालीच्या बांधकामामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या भागातील नाली बांधकाम वर आणि रस्ता खाली झाल्यामुळे वहिवाटीसाठी नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. येत्या तीन दिवसांत ही दुरुस्ती न केल्यास नाली फोडो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली यांच्याकडे याबाबतचे निवेदन सोपविण्यात आले आहे. ‘लोकमत’ने अनेकदा या समस्येकडे लक्ष वेधले. शिवाय नगरसेवक तथा नागरिकांनीसुद्धा अनेकदा तक्रार केली. सुमारे वर्षभरापासून ही समस्या ‘जैसे थे’ असून अधिकारी - लोकप्रतिनिधी गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.
अतुल लांबट, राजेश धोंगडे, अरूण बारई, सुनील बेले, प्रमोद जयस्वाल, विनोद राऊत, कृष्णा हेडावू, संजय जोशी, वरुण बिसेन, निमीष पुंड, विठ्ठल बोरघरे, सुबोध लांबाडे, रमेश झोडे, महादेव खारकर, वनीता पडगेलवार, भगवान बेले, सुनीता बेले, आर. डी. गावंडे, यशवंत वरभे, विनोद कुहीकर, विनायक बोकडे, एम. व्ही. गिरी, शशिकांत बेले आदींनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
-