Dr. Vritika Patil is winner of 'Mrs West Asia' | नागपुरातील डॉ. वर्तिका पाटील ‘मिसेस वेस्ट एशिया’ विजेत्या

नागपुरातील डॉ. वर्तिका पाटील ‘मिसेस वेस्ट एशिया’ विजेत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील न्यूरोपॅथालॉजिस्ट डॉ. वर्तिका हिमांशु पाटील या‘मिसेस वेस्ट एशिया’स्पर्धेच्या विजेता ठरल्या आहेत. नुकतीच पुणे येथे झालेल्या या सौंदर्य स्पर्धेत प्रसिद्ध अभिनेत्री आदिती गोवात्रीकर यांच्या हस्ते त्यांना विजेतापद प्रदान करण्यात आले. या निवडीमुळे येत्या २२ डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यान चीन येथे होणाऱ्या मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत वेस्ट एशियासह नागपूरचेही प्रतिनिधित्व करणार आहेत. डॉ. वर्तिका या शहरातील एका खासगी रुग्णालयात न्यूरोपॅथालॉजिस्ट व क्वॉलिटी मॅनेजर म्हणून सेवारत आहेत. या स्पर्धेसाठी त्या अंजना मास्करेन्हास व कार्ल मास्करेन्हास यांच्याकडून कोचिंग
घेत आहेत.

Web Title: Dr. Vritika Patil is winner of 'Mrs West Asia'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.