शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. संजीव चौधरींच्या 'हेटको' प्रकल्पाचे पॅरिसमध्ये कौतुक ! अस्थिभंग, हाडांच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी महत्वाचे मॉडेल

By सुमेध वाघमार | Updated: November 29, 2025 19:53 IST

Nagpur : उपराजधानी नागपूरसाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. नागपूरचे प्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांनी दहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या 'हेटको' ( हेल्थ एज्युकेशन अँड टेलीकन्सल्टेशन) प्रकल्पाने आता जागतिक स्तरावर आपले महत्त्व सिद्ध केले आहे.

नागपूर: उपराजधानी नागपूरसाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. नागपूरचे प्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांनी दहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या 'हेटको' ( हेल्थ एज्युकेशन अँड टेलीकन्सल्टेशन) प्रकल्पाने आता जागतिक स्तरावर आपले महत्त्व सिद्ध केले आहे. अस्थिभंग आणि हाडांच्या ठिसूळपणाच्या आजाराने (आॅस्टिओपोरोसिस) त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी तयार केलेल्या या अनोख्या मॉडेलला पॅरिसमध्ये झालेल्या वैद्यकीय परिषदेत मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.   'हेटको' प्रकल्पाच्या या कायार्मुळे, जगातील ५० अस्थिरोग तज्ज्ञाच्या गटात डॉ. संजीव चौधरी यांची निवड झाली आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘टेले कन्सल्टेशन’ प्रणालीचा वापर करत गावखेड्यातील विशेषत: महिलांसाठी आॅस्टिओपोरोसिस या हाडांच्या आजाराचे व्यवस्थापन करणारे हे एक अनोखे आणि प्रभावी मॉडेल ठरले आहे. कोर फाऊंडेशनच्या माध्यमातून डॉ. चौधरी यांनी 'हेटको' प्रकल्प विदर्भासह पूर्वोत्तर भारतातील १०० हून अधिक गावांमध्ये यशस्वीरित्या राबवला. याची सुरुवात मध्य प्रदेशातील दुर्गम भागातील 'तायगाव खैरी' गावातून झाली. या प्रकल्पासाठी एक विशेष वाहन विकसित करण्यात आले आहे, जे गावात जाऊन आॅस्टिओपोरोसिसबद्दलची माहिती चित्रांसह ध्वनीफितीद्वारे प्रसारित करते आणि महिलांना एकत्र आणते. इंटरनेटच्या मदतीने, वाहनावरील टीव्ही स्क्रीनद्वारे नागपूरमध्ये असलेले डॉ. चौधरी थेट उपस्थितांशी संवाद साधतात आणि उपचारांसोबतच प्रतिबंधात्मक उपायांचे मार्गदर्शन करतात. यामुळे आॅस्टिओपोरोसिससारख्या गंभीर आजारावर वेळेवर उपचार व मार्गदर्शन मिळणे शक्य झाले आहे.

स्वीडनमध्येही भारतीय संशोधनाचा गौरव 

पॅरिसमधील सन्मानासोबतच, डॉ. चौधरी यांना स्वीडनमधील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून भारतीय ‘डायस्पोरा’ला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तेथे त्यांनी रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांमध्ये ‘व्हिटॅमिन-डी’ची कमतरता आणि आॅस्टिओपोरोसिसच्या वाढीवर महत्त्वपूर्ण संशोधन सादर केले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Dr. Choudhary's 'Hetco' Project Lauded in Paris: Bone Health Model

Web Summary : Dr. Sanjeev Choudhary's 'Hetco' project, aiding osteoporosis patients in rural India through telemedicine, received recognition in Paris. The model, utilizing mobile health units and remote consultations, effectively manages bone health issues in underserved communities. His research on Vitamin-D deficiency was also presented in Sweden.
टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्य