डॉ. पालतेवार यांना अटकपूर्व जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:08 IST2021-07-31T04:08:32+5:302021-07-31T04:08:32+5:30

न्यायमूर्ती विनय जोशी यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. या निर्णयाविरुद्ध पालतेवार सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहे. त्यामुळे उच्च ...

Dr. Paltewar was denied pre-arrest bail | डॉ. पालतेवार यांना अटकपूर्व जामीन नाकारला

डॉ. पालतेवार यांना अटकपूर्व जामीन नाकारला

न्यायमूर्ती विनय जोशी यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. या निर्णयाविरुद्ध पालतेवार सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण मंजूर केले. याकरिता पालतेवार यांनी विनंती केली होती.

कंपनीचे भागधारक गणेश चक्करवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी २० फेब्रुवारी २०२१ रोजी डॉ. पालतेवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०९ ४०६, ४६५, ४६७, २६८, ४७१ व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(सी) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पालतेवार यांनी संगणकीय यंत्रणेमध्ये मूळ बिलापेक्षा कमी रकमेची बिले दाखवून लाखो रुपयांची अफरातफर केल्याचा चक्करवार यांचा आरोप आहे. सत्र न्यायालयाने गेल्या १५ मार्च रोजी पालतेवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज खारीज केला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पालतेवार यांच्यातर्फे वरिष्ठ वकील ॲड. अविनाश गुप्ता व ॲड. आकाश गुप्ता तर, चक्करवार यांच्यातर्फे ॲड. श्याम देवानी यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Dr. Paltewar was denied pre-arrest bail