डॉ. चंडोक मल्टीस्पेशालिटी डेंटल केअरचे उद्घाटन
By Admin | Updated: November 30, 2015 02:47 IST2015-11-30T02:47:51+5:302015-11-30T02:47:51+5:30
डॉ. चंडोक मल्टीस्पेशालिटी डेंटल केअर क्लिनीकचे रविवारी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

डॉ. चंडोक मल्टीस्पेशालिटी डेंटल केअरचे उद्घाटन
दंतविकारांवर अद्ययावत उपचार
नागपूर : डॉ. चंडोक मल्टीस्पेशालिटी डेंटल केअर क्लिनीकचे रविवारी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हा कार्यक्रम प्लॉट नं.११, झेंडा चौक धरमपेठ येथे पार पडला. यावेळी क्लिनीकचे संचालक डॉ. जसमीत सिंह चंडोक (एमडीएस-प्रोस्थोडॉन्टिस्ट्स) व संचालिका डॉ. दीपिका चंडोक (एमडीएस-एन्डोडॉन्टिस्ट्स) यांनी खासदार दर्डा यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दंत उपचाराच्या पद्धतीची माहिती दिली. सर्व प्रकाराच्या दातांच्या विकारांवर येथे उपचार होतो, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी हरभजन सिंह चंडोक, माजी मंत्री अनिल देशमुख, आरती देशमुख, माजी मंत्री रणजित देशमुख, रुपा देशमुख, ऋषिकेश देशमुख, डॉ. प्रकाश ठोसरे, ज्योती ठोसरे, मॅटचे उपाध्यक्ष बी. मजुमदार, अॅड. जयवंत गोहोकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.