कुही : साळवा येथील माताेश्री प्रभादेवी सेवा संस्थेच्या वतीने महामानवास आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून कुही व मांढळ शहरात निर्जंतुकीकरण फवारणी तसेच मास्क वितरित करण्यात आले. तालुक्यात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा उपक्रम राबविला जात असल्याचे संस्थेचे संस्थापक प्रमाेद घरडे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी कुही शहरात मास्क वितरण व निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी मांढळ शहरात संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले. सोबतच कोरोनाबाबत नियमांची जनजागृती करणे हे कार्य संस्थेतर्फे सुरू असून, लसीकरण माेहिमेत ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे. अनावश्यक गर्दी टाळावी, प्रकृतीबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रमोद घरडे यांनी यावेळी केले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:07 IST