शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जागेच्या लीजसाठी पाठपुरावा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 23:53 IST

Babasaheb Ambedkar Memorial site issue डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व स्मारकाकरिता सरकारकडून प्रस्तावित जागेचे लीज नुतनीकरण होणे गरजेचे आहे. प्रशासनाने यासाठी पाठपुरावा करावा, स्मारकाच्या डिझाईनकरिता वैश्विकस्तरावर आर्किटेक यांची स्पर्धा घ्यावी, असे निर्देश गुरुवारी सभागृहात महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व स्मारकाकरिता सरकारकडून प्रस्तावित जागेचे लीज नुतनीकरण होणे गरजेचे आहे. प्रशासनाने यासाठी पाठपुरावा करावा, स्मारकाच्या डिझाईनकरिता वैश्विकस्तरावर आर्किटेक यांची स्पर्धा घ्यावी, असे निर्देश गुरुवारी सभागृहात महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

महापालिकेच्या पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व स्मारकाचा विषय मांडला. यावर आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, १९७७ मध्ये या जागेची लीज संपली. शासनाकडून ही जागा मिळाल्याशिवाय त्यावर प्रोजेक्ट उभारता येत नाही. जागेवरील स्मारकाचे ग्लोबल एस्टिमेट तयार करून शासनाकडे पाठविल्यानंतर लीज नुतनीकरण झाल्यास प्रोजेक्ट सुरू करता येणे शक्य होईल. त्यावर महापौरांनी ग्लोबल एस्टिमेट तयार करण्याचे निर्देश दिले.

मनपाचा लाखोंचा खर्च

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक तोडण्यावरून सभेत नाराजी व्यक्त केली. नगरसेवक संदीप सहारे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सभागृह तोडणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली. तर लीज संपल्यानंतर ही जागा शासनाची असताना या ठिकाणी अंबाझरी उद्यानाच्या देखरेखीकरिता महापालिका दरवर्षी लाखोंचा खर्च करत होती. याची चौकशी लावण्याची मागणी अ‍ॅड. धर्मापाल मेश्राम यांनी केली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका