शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
2
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
3
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
4
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
5
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
6
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
7
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
8
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
9
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
10
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
11
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
12
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
13
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
14
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
15
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
16
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
17
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
18
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
19
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
20
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा

डॉ. दंदे हॉस्पिटलची रौप्य महोत्सवी वाटचाल ‘आधी उपचार, नंतर व्यवहार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:10 IST

- मल्टीस्पेशालिटी, सुपरस्पेशालिटीचा मुहूर्त रोवणारे अग्रणी इस्पितळ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ज्या काळात नागपुरात वैद्यकीय सेवांमध्ये सुधारणा होत ...

- मल्टीस्पेशालिटी, सुपरस्पेशालिटीचा मुहूर्त रोवणारे अग्रणी इस्पितळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ज्या काळात नागपुरात वैद्यकीय सेवांमध्ये सुधारणा होत होती. त्याच काळात वैद्यकीय क्षेत्राला बहुआयामी कलाटणी देण्यात ज्या खासगी वैद्यकीय संस्था होत्या, त्यात डॉ. दंदे हॉस्पिटल अग्रणी ठरते. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी हॉस्पिटल २५ वर्षे पूर्ण करत आहे. या पार्श्वभूमीवर २५ वर्षे मागे वळून पाहिले तर हॉस्पिटलवर रुग्णांनी दाखविलेला विश्वास आणि त्या विश्वासपूर्तीचा अखंड प्रवास अनेकांच्या नजरेपुढे उभा राहतो. वैद्यकीय सेवेचा वारसा जपणारी डॉ. पिनाक दंदे हे दंदे कुटुंबातील सातव्या पिढीचे नेतृत्व करतात. आधी मल्टीस्पेशालिटी, नंतर सुपरस्पेशालिटी आणि आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बहुआयामी सेवा असणाऱ्या सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस इन वन रूफचा पायंडा पाडण्यास डॉ. दंदे हॉस्पिटल्स सज्ज आहे. रौप्य महोत्सवानिमित्त डॉ. पिनाक दंदे यांनी ही घोषणा केली आहे.

१९९६ हे वर्ष खऱ्या अर्थाने नागपुरातील वैद्यकीय क्षेत्राला कलाटणी देणारे ठरले. तोवर शहरात मेडिकल कॉलेज व मेयो इस्पितळ हे दोनच शासकीय इस्पितळ होते आणि त्यातच सुविधा सर्वच होत्या. मात्र, प्रगत तंत्रज्ञानाची उणीव होती. या वर्षापर्यंत दोन खासगी इस्पितळांनी मल्टिस्पेशालिटी सेवा देण्यास प्रारंभ केला होता. १९९६ मध्ये १८ फेब्रुवारीला रविनगर चौक येथे डॉ. दंदे हॉस्पिटलची उभारणी झाली. मल्टिस्पेशालिटी सेवा देणारे हे तिसरे खासगी इस्पितळ ठरले. इतकेच नव्हे तर औषधालय अर्थात इन हाऊस मेडिकल स्टोर व एका कॉलवर रुग्णवाहिकेची सुविधा देणारे डॉ. दंदे हॉस्पिटल हे नागपुरातील पहिले इस्पितळ ठरले. शिवाय, व्हॅल्यूॲडेड सर्व्हिसेस ज्यात फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन, दंत चिकित्सा आदी आरोग्यवर्धक सेवांची एकाच छताखाली उभारणी याच हॉस्पिटलने केली. हेतू हाच होता की, रुग्णांना वेगवेगळ्या वेदनांवरील उपचारासाठी गावभर पडण्याची गरज पडू नये. रुग्ण आला की सर्व उपचार व त्याचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी व्हावेत आणि आलेला रुग्ण पूर्णत: वेदनामुक्त होईल. विशेष म्हणजे, या सगळ्या सुविधा देताना हाॅस्पिटलच्या यादीत पैसा हा प्राधान्यक्रमात कधीच नव्हता. बरेचदा पैशाअभावी रुग्ण हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत नाही. तो आजारासह जगतो आणि तसाच जातो. ही जाणिव समाजसेवेत असलेल्या डॉ. पिनाक दंदे व त्यांची पत्नी डॉ. सीमा दंदे यांना होती. अगदी हॉस्पिटलच्या उभारणीपासून ते आजपर्यंत आणि पुढेही ‘आधी उपचार, नंतर व्यवहार’ हे ब्रीद हॉस्पिटलने जपले आहे. शिवाय, ‘माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ हे ब्रीद रुग्णांच्या मनात बिंबवण्याचे कार्य हॉस्पिटलने सातत्याने केले आहे. येथे आलेला रुग्ण पैशाअभावी उपचाराविना कधीच परत गेला नाही. अगदी कोरोना काळात गर्भवती महिलांची प्रसुती करणारे डॉ. दंदे हॉस्पिटल हे शहरातील पहिले आहे. न्यूनतम खर्चात रुग्णावर उपचार व उत्तम सेवा, ही परंपरा हॉस्पिटलने पाळली आहे आणि त्याचा परिणाम म्हणा रुग्णांचा विश्वास हॉस्पिटलवर एवढा आहे की पैशाचा ताण रुग्णावर कधीच नसतो. हॉस्पिटलचा असा हा प्रवास वैद्यकीय क्षेत्रात एक मानदंड ठरतो. दंदे कुटुंबीयांची आठवी पिढीही मुलांच्या रूपाने वैद्यकीय सेवेसाठी सज्ज झाली आहे, हे विशेष.

-----------

मेडिक्लेम पॉलिसी काढण्याला दिले जाते प्रोत्साहन

वर्तमानात ताणतणाव, रस्त्यांवरचा वाढलेला वेग यांमुळे आरोग्याला कधी बाधा पोहोचेल सांगता येत नाही. काही आजार, अपघात प्रचंड गुंतागुंतीचे असतात. अशा स्थितीत खर्च प्रचंड होतो. बहुतांश नागरिकांना एवढा खर्च करणे शक्य नसते. मदत करणाऱ्यांच्याही मर्यादा असतात. अशा वेळी आरोग्यासाठी पैशाची चिंताच राहणार नाही, अशी काळजी रुग्णाने घेणे अपेक्षित असते. त्याच दृष्टिकोणातून हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मेडिक्लेम पॉलिसी काढण्यास प्रोत्साहित केले जाते.

------------

अपघात, क्राईमच्या केसेस सुरुवातीपासूनच हाताळल्या

डॉ. दंदे हॉस्पिटलने मेडिकल कॉलेज व मेयो इस्पितळासोबतच पोलिसांना सुविधा व्हाव्या म्हणून अपघात, सुसाईड, गुन्हेगारीच्या उपचाराच्या केसेस हाताळण्यास किंतु-परंतु कधीच केले नाही. अशा केसेस हाताळणारे डॉ. दंदे हे शहरातील पहिले खासगी इस्पितळ आहे. अगदी आताही ती परंपरा सुरू आहे.

----------

रुग्ण कसाही असो उपचार झालेच पाहिजे

रुग्ण कसाही असो, कितीही गुंतागुंतीचा असो. हॉस्पिटलमध्ये आला की त्याच्यावर उपचार करणे हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. किमान प्राथमिक उपचार करून, त्याला तिथे कुठे जायचे तेथे जावे. मात्र, उपचाराविना जाऊ नये, पैशाविना अडू नये ही परंपरा हॉस्पिटलने अव्याहत जपली आहे. हॉस्पिटलच्या याच भावनेमुळे रुग्णांचा विश्वास वाढला आहे.

-----------

२०२२ मध्ये होणार दीडशे बेड्सचे ‘सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस अंडर वन रूफ’

रविनगर चौकात डॉ. दंदे हॉस्पिटलच्या ५०-५० बेडच्या दोन शाखा आहेत. येथेच हॉस्पिटलचा विस्तार केला जाणार असून, १५० बेडची सुविधा असणारे सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस अंडर वन रूप साकारले जाणार आहे. २०२२ मध्ये हे हॉस्पिटल पूर्ण होणार असून, येथे जगपातळीवरील अत्याधुनिक उपकरणे लागणार असून, रुग्णसेवा अधिक तत्पर केली जाणार असल्याचे डॉ. पिनाक दंदे यांनी सांगितले.

----------

डॉ. दंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा

गोरगरिबांना मदत, गरजूंपर्यंत शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य डॉ.दंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून केले जाते. आजवर अनेक उपक्रमांंद्वारे या सेवेचा लाभ गरजूंनी घेतला आहे.

------

मृत गर्भवती महिलेची प्रसुती ठरली विस्मयकारी

२०११च्या थर्टी फर्स्टला एक आगळीवेगळी केस डॉ. दंदे हॉस्पिटलने सोडवली. गर्भवती महिला मृत्युमुखी पडली होती. मात्र, तिचा गर्भ जिवंत होता. अशा अवस्थेत रात्री १२.१५ मिनिटांनी सिझेरियन पद्धतीने ही प्रसुती करण्यात आली. तो मुलगा आजही ठणठणीत आहे. विशेष म्हणजे मावळतीचा आणि उगवतीचा हा प्रसंग जगभरात गाजला होता आणि डॉ. दंदे हॉस्पिटलचे कौतुक झाले होते.

-------

पहिली कोरोना संक्रमित गर्भवती प्रसुती इथेच

आठ महिने उपचार केल्यानंतरही कोरोना संक्रमण जडल्यामुळे जवळपास सगळ्याच हॉस्पिटलने प्रसुती करण्यास नकार दिला होता. काही हाॅस्पिटलने लाखोंचा खर्च सांगितला होता. अखेर ही संक्रमित गर्भवती महिला डॉ. दंदे हॉस्पिटलमध्ये आली. आर्थिक संकटासोबतच संक्रमणाची अवस्था व्यक्त केली. शहरातील ही पहिली कोरोना संक्रमित गर्भवतीची प्रसुती यशस्वीरीत्या विनाशुल्क पार पाडण्यात आली.

-----------

प्रेग्नन्सी व स्पाईन ऑपरेशन दोन्ही यशस्वी

मुरैना येथून एक गर्भवती महिला येथे आली. पैसा तिच्याकडे नव्हता. सोबतच तिला स्पाईनल प्रॉब्लेम होता. ती कायम झोपूनच असायची. अशा अवस्थेत तिची प्रसुती आणि स्पाईन ऑपरेशन नि:शुल्क केले. आज ती पूर्णत: सुदृढ आहे.

--------

अशरबी आज उभी राहते ()

यवतमाळ येथील नेर तालुक्यात राहणारे ताने खान यांची पत्नी अशरबी यांचा पाय कर्करोगाने सडायला लागला होता. पैसा नसल्याने उपचार न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ही बाब डॉ. पिनाक दंदे यांना कळली. त्यांनी स्वखर्चाने त्यांना नागपूरला बोलावले आणि उपचार केले. पाय कापावा लागला. मात्र, त्या सुदृढ आहेत आणि कृत्रिम पायावर चालत आहेत.

--------

* मुलगी जिवंत आहे ती डॉ. दंदेमुळेच ()

माझी मुलगी तिसऱ्या माळ्यावरून पडली होती. हात, पाय तुटले होते. किचकट स्थितीत होती. पैसाही नव्हता. अशा स्थितीत डॉ. दंदे धावून आले. त्यांनी उपचार केले आणि मुलीला वाचवलेच, सोबत ती आज सुदृढ आहे.

- केशव डोंगरे, पांढराबोडी

* माणुसकी जपणारा डॉक्टर ()

गेल्या २५ वर्षापासून रुग्ण या नात्याने डॉ. दंदे हॉस्पिटलशी संबंध आहे. डॉ. पिनाक दंदे यांच्यासोबतच त्यांचा संपूर्ण स्टाफ मनमिळाऊ आहे. विशेष म्हणजे एकसाथ ५० कामे अतिशय संयमाने हाताळणे, हे डॉ. पिनाक दंदे यांचे कौशल्य आहे. डॉक्टरातील माणूस म्हणून, मी त्यांना ओळखतो.

- ॲड. रमेश आदमने, नागपूर

............