डॉ. शांतीलाल कोठारी यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST2021-07-28T04:08:25+5:302021-07-28T04:08:25+5:30
सोयाबीन दुधाचे जनक, लाखोळी डाळीसाठी संघर्ष करणारे आहारतज्ज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी यांच्या निधनाने एक प्रामाणिक व ध्येयासक्त व्यक्तिमत्त्व आपल्यातून ...

डॉ. शांतीलाल कोठारी यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना
सोयाबीन दुधाचे जनक, लाखोळी डाळीसाठी संघर्ष करणारे आहारतज्ज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी यांच्या निधनाने एक प्रामाणिक व ध्येयासक्त व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले. ॲकेडमी ऑफ न्युट्रिशन इम्प्रुव्हमेंट या संस्थेच्या माध्यमातून योग्य आहाराबाबत त्यांनी दीर्घकाळ जनजागरण केले. तळागाळातील वर्गाला पोषक आहार मिळावा यासाठी ते सतत प्रयत्नरत होते.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
शेतकरी हक्कासाठी लढणारा कार्यकर्ता हरपला
लाखोळीची डाळ असो की सोयाबीनची उत्पादने, त्यांचे संपूर्ण आयुष्यच संशोधन व संघर्षाचे राहिले. कोणत्याही विषयाचा गाढा अभ्यास करून त्यासाठी संपूर्ण समर्पण भावनेने ते लढा देत असत. डॉ. शांतीलाल कोठारी यांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा एक खंदा कार्यकर्ता हरपला.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा, महाराष्ट्र
विदर्भाने ‘कार्व्हर’ गमावला
विदर्भातील विविध वनस्पतींवर व लाखोळी डाळीवर मूलभूत संशोधन करून त्या लोकोपयोगी असल्याचे सिद्ध करणारे थोर शास्त्रज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी यांच्या निधनाने देश व विदर्भाने आधुनिक ‘जॉर्ज वाॅशिंग्टन कार्व्हर’ गमावला आहे.
- डॉ. नितीन राऊत, नागपूरचे पालकमंत्री व ऊर्जामंत्री, महाराष्ट्र
काळाच्या पुढे चालणारा समाजसेवक गमावला
डॉ. शांतीलाल कोठारी यांनी सोयामिल्कबाबत मूलभूत काम केले. त्यासाठी आयुष्य वेचले. अनेकदा प्राणांतिक उपोषणे केली. प्रारंभी समाज किंवा सरकारला त्याचे महत्त्व कळाले नाही. त्यांच्या रूपाने विदर्भाने काळाच्या पुढे चालणारा समाजसेवक गमावला.
- विजय दर्डा, माजी राज्यसभा सदस्य