डॉ. सुधीर गुप्ता मेडिकलचे प्रभारी अधिष्ठाता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST2021-02-24T04:09:25+5:302021-02-24T04:09:25+5:30
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा २१ जानेवारीपासून वैद्यकीय कारणास्तवर रजेवर गेले आहेत. त्यांनी दुसऱ्यांदा स्वेच्छानिवृत्तीचा अर्जही दिला आहे. यामुळे ...

डॉ. सुधीर गुप्ता मेडिकलचे प्रभारी अधिष्ठाता
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा २१ जानेवारीपासून वैद्यकीय कारणास्तवर रजेवर गेले आहेत. त्यांनी दुसऱ्यांदा स्वेच्छानिवृत्तीचा अर्जही दिला आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. सिंह यांच्याकडे मेडिकलची जबाबदारी सोपविण्यात आली होती. डॉ. गुप्ता यांची सेवाजेष्ठता वगळून डॉ. सिंह यांना मेडिकलचा भार दिल्याने उलट-सुलट चर्चेला पेवही फुटले होते. परंतु आता डॉ. गुप्ता यांच्याकडे मेडिकलचे प्रभारी अधिष्ठाता पद आल्याने महिन्याभरापासून खोळंबलेली कामे वेगाने पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, जिल्हा नियोजन समितीकडून मेडिकलला मिळालेला १२ कोटी परत जाण्याचा वाटेवर आहे. तो परत आणण्यासाठी डॉ. गुप्ता यांना बरेच प्रयत्न करावे लागणार आहे. केंद्राचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे व रुग्णांना अद्ययावत सेवा देण्याचा प्रयत्नांना प्राधान्य देणार असल्याचे डॉ. गुप्ता यांनी ‘लोकमत’ला सांगितले.