डॉ. अजय डवले यांच्याकडे प्राचार्यपद, डॉ. मडावी यांच्याकडे डागाची जबाबदारी

By सुमेध वाघमार | Updated: February 2, 2024 21:45 IST2024-02-02T21:45:10+5:302024-02-02T21:45:17+5:30

जिल्हा आरोग्य अधिकाºयाचे पद रिक्त

Dr. Ajay Dawle has the principalship, Dr. Madavi is responsible for the stain | डॉ. अजय डवले यांच्याकडे प्राचार्यपद, डॉ. मडावी यांच्याकडे डागाची जबाबदारी

डॉ. अजय डवले यांच्याकडे प्राचार्यपद, डॉ. मडावी यांच्याकडे डागाची जबाबदारी

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागात शुक्रवारचा दिवस बदल्यांचा ठरला. राज्यातील ‘अ गटातील’ सात अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश धडकले. यात नागपुरातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांचीे राज्य आरोग्य व प्रशिक्षण केंद्राचा प्राचार्यपदी बदली करण्यात आली.

        डॉ. डवले हे सात महिन्यांपूर्वीच नागपूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून पदभार सांभाळला होता. दरम्यानच्या काळात लोकसेवा आयोगाची परिक्षा पास झाल्याने त्यांची बदली उपसंचालक आरोग्य सेवा (मौखीक आरोग्य कार्यक्रम दंत, मुंबई) म्हणून झाली. परंतु त्यांच्या विनंती अर्जावरून नागपूरच्या जिल्हा आरोग्य अधिकारीपदी कायम होते. आता त्यांची बदली राज्य आरोग्य व प्रशिक्षण केंद्राचा प्राचार्यपदी करण्यात आली. २०२२ पासून या पदावर असलेले डॉ. पुरुषोत्तम मडावी यांची बदली डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पदावर करण्यात आली. तुर्तास जिल्हा आरोग्य अधिकारीपदी कोणाची वर्णी लागलेली नाही. अनेक अधिकारी या पदावर डोळा ठेवून असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Dr. Ajay Dawle has the principalship, Dr. Madavi is responsible for the stain