डीपीसीचा निधी वाढणार
By Admin | Updated: February 23, 2015 02:25 IST2015-02-23T02:25:55+5:302015-02-23T02:25:55+5:30
नागपूरच्या जिल्हा विकास निधीत (डीपीसी) अल्पशी वाढ झाल्याने निर्माण झालेल्या नाराजीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात वाढ करून देण्याचे स्पष्ट संकेत येथे दिले.

डीपीसीचा निधी वाढणार
प्रभाव लोकमतचा
नागपूर : नागपूरच्या जिल्हा विकास निधीत (डीपीसी) अल्पशी वाढ झाल्याने निर्माण झालेल्या नाराजीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात वाढ करून देण्याचे स्पष्ट संकेत येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नुतनीकृत बचत भवनाचे उद््घाटन रविवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. व्यासपीठावर आमदार सर्वश्री विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी,जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर,जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे उपस्थित होते.२०१५-१६ या वर्षासाठी नागपूर जिल्ह्याच्या वार्षिक योजनेत अर्थमंत्र्यांनी फक्त २५ कोटींची वाढ करीत २५० कोटी रुपयाना मान्यता दिली. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. अध्यक्षीय भाषणात चंद्रशेखर बावनकुळे यांनी याकडे लक्ष वेधत डीपीसीच्या निधीत ३०० कोटी रुपयांपर्यंत वाढ करून देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात जिल्हा विकास निधीत वाढ करून देण्याचे स्पष्ट संकते दिले. ते म्हणाले की, विकास निधीत किती वाढ करणार याची घोषणा येथे करणार नाही. पण जिल्ह्याच्या विकास निधीत वाढ होणे आवश्यक आहे. नागपूर ही उपराजधानी आहे. त्यामुळे या जिल्ह्याला विशेष निधी मिळायला पाहिजे. यातून जास्तीत जास्त निधी शहराच्या विकास कामांवरही खर्च झाला पाहिजे.प्रास्ताविक जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी केले. त्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या अधिकारात वाढ करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली.
संचालन जिल्हा नियोजन अधिकारी के.व्ही. फिरके यांनी केले. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे,उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, गिरीश जोशी, जे.बी.संगीतराव प्रकाश पाटील, आशा पठाण, सुजता गंधे,अनिता मेश्राम,उपजिल्हा निवडणूक अधिकारी अजय रामटेके सावनेरचे उपविभागीय अधिकारी शेखर सिंग, जिल्हा पुरवठा अधिकारी एन. आर. वंजारी, अन्न धान्य पुरवठा अधिकारी रमेश बेंडे,एल.जे. वार्डेकर यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. १९८५ मध्ये बचत भवन बांधण्यात आले होते. त्यानंतर २०१५ ला त्याचे नुतनीकरण करण्यात आले. त्यावर १ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून नवीन सभागृहाची आसन क्षमता १६० असून व्यासपीठावर १५ जणांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.