कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST2021-01-19T04:10:28+5:302021-01-19T04:10:28+5:30

नागपूर : मागील काही दिवसांपासून ३५० ते ४५० वर जाणाऱ्या बाधितांच्या संख्येत सोमवारी दुपटीने घट झाली. १५० नव्या बाधितांची ...

Doubling the number of corona patients | कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीने घट

कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीने घट

नागपूर : मागील काही दिवसांपासून ३५० ते ४५० वर जाणाऱ्या बाधितांच्या संख्येत सोमवारी दुपटीने घट झाली. १५० नव्या बाधितांची व ९ मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, दैनंदिन पाच हजारावर जाणाऱ्या चाचण्या अर्ध्यावर आल्याने रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. रुग्णांची एकूण संख्या १३०६१९, तर मृतांची संख्या ४०८१ वर गेली आहे.

नागपूर जिल्ह्यात सोमवारी २०७६ संशयित रुग्णांची आरटीपीसीआर, तर ५०२ रुग्णांची रॅपिड अँटिजेन, अशा एकूण २५७८ चाचण्या करण्यात आल्या. मागील दोन महिन्यात प्रथमच एवढ्या कमी चाचण्या झाल्या. अँटिजेन चाचणीतून ५२, तर आरटीपीसीआर चाचणीतून ९८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १३०, ग्रामीणमधील १७, तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील ४, ग्रामीणमधील २, तर जिल्ह्याबाहेरील ३ मृत्यू आहेत. सध्या ३९६० रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील ९७५ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती आहेत, तर ३८४२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

- ३९४ रुग्ण बरे

नागपूर जिल्ह्यात सोमवारी ३९४ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १२२५७८ झाली. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये रविवारी १६२ रुग्ण उपचाराखाली होते. सोमवारी ही संख्या ७० वर आली. दिवसभरात ९२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिल्याचे दिसून येते, तर, मेयोमध्ये रविवारी ५२ रुग्ण भरती होते, सोमवारी ही संख्या वाढून ७९ वर गेली आहे.

- दैनिक संशयित : २५७८

- बाधित रुग्ण : १३०६१९

_- बरे झालेले : १२२५७८

- उपचार घेत असलेले रुग्ण : ३९६०

- मृत्यू : ४०८१

Web Title: Doubling the number of corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.