कोरोनाच्या रुग्णांत दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:07 IST2021-07-28T04:07:58+5:302021-07-28T04:07:58+5:30

नागपूर : कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असताना मंगळवारी दुपटीने वाढ होऊन १४ वर पोहचली. रुग्णाच्या अचानक ...

Doubling in corona patients | कोरोनाच्या रुग्णांत दुपटीने वाढ

कोरोनाच्या रुग्णांत दुपटीने वाढ

नागपूर : कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असताना मंगळवारी दुपटीने वाढ होऊन १४ वर पोहचली. रुग्णाच्या अचानक वाढीने आरोग्य यंत्रणेत चिंता वाढली आहे. यातच ११ दिवसानंतर आज पहिल्यांदाच मृत्यूचीही नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,९२,८३६ तर मृतांची संख्या १०,११६ झाली.

नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ५,८२१ चाचण्या झाल्या. पॉझिटिव्हीटीचा दर ०.२४ टक्के होता. शहरात ४,७०३ चाचण्यांमधून ६ तर, ग्रामीणमध्ये १,११८ चाचण्यांमधून ८ कोरोनाबाधित आढळून आले. १६ जुलैपर्यंत शहर व ग्रामीणमध्ये एकाही मृत्यूची नोंद नव्हती. आज पहिल्यांदाच शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानुसार आतापर्यंत ५,८९२ मृत्यू झाले आहेत. तर, ३,३९,९४८ रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीणमध्ये २,६०३ मृत्यू व १,४६,०८३ रुग्णांची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कोरोनाचा नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

-कोरोनाचे २२२ सक्रिय रुग्ण

कोरोनाचे सध्या शहरात १६८, ग्रामीणमध्ये ४९ तर जिल्हा बाहेर ५ असे एकूण २२२ सक्रिय रुग्ण आहेत. यातील १६८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ५४ रुग्ण विविध शासकीयसह खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आज १५ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाºया रुग्णांची संख्या ४,८२,४९८ झाली आहे.

कोरोनाची मंगळवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ५८२१

शहर : ६ रुग्ण व १ मृत्यू

ग्रामीण : ८ रुग्ण व ० मृत्यू

एकूण बाधित रुग्ण :४,९२,८३६

एकूण सक्रीय रुग्ण : २२२

एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८२,४९८

एकूण मृत्यू : १०,११६

Web Title: Doubling in corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.