दुहेरी हत्याकांड;पाच गजाआड

By Admin | Updated: November 22, 2015 03:05 IST2015-11-22T03:05:43+5:302015-11-22T03:05:43+5:30

इंद्रप्रस्थनगरातील दुहेरी हत्याकांडात सोनेगाव पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली.

Double murder, five junk robbery | दुहेरी हत्याकांड;पाच गजाआड

दुहेरी हत्याकांड;पाच गजाआड

सोनेगाव पोलिसांची कारवाई : अनैतिक संबंधाचा वाद
नागपूर : इंद्रप्रस्थनगरातील दुहेरी हत्याकांडात सोनेगाव पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली. कैलाश सुरेश भारद्वाज (वय २७), संजय ऊर्फ सोनू कुलसिंह भारद्वाज (वय २०), छोटेलाल ऊर्फ छोटू शिवजी महंतो (वय ३०), प्रतिक ऊर्फ बाबी राहुल सहारे (वय २२) आणि महेश ऊर्फ सिबलू राजेश नायडू अशी या आरोपींची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या सात झाली आहे.
मंगळवारी रात्री इंद्रप्रस्थनगरातील रेल्वेच्या डम्पिंग यार्डजवळ बंटी ऊर्फ संदीप शरद आटे (वय २५, रा. तुकडोजीनगर) आणि रवी प्रकाश टुले (वय २६, रा. गोपालनगर) या दोघांची निर्घृण हत्या झाली होती. बुधवारी सकाळी हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आल्यानंतर ठाणेदार अरुण जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने आरोपी मनोजला अटक केली. त्याने या दुहेरी हत्याकांडाची कबुली दिली. रवीच्या प्रेयसीने दिलेल्या दुचाकीवरून वाद झाल्यामुळे हत्याकांड घडल्याचे त्याने सांगितले.
रवीचे एका विधवा महिलेशी अनैतिक संबंध होते. तिने रवीला प्लेझर दिली. रवीने ही दुचाकी मनोजला वापरायला दिली. मनोजकडून दुचाकी परत घेतल्यानंतर ती गहाण ठेवली. हा प्रकार मनोजने रवीच्या प्रेयसीला सांगितला. त्यामुळे रवीवर त्याची प्रेयसी भडकली. तिने दुचाकी परत मिळवण्यासाठी रवीमागे तगादा लावला. दुचाकी गहाण ठेवल्याची माहिती मनोजने प्रेयसीला सांगितल्याचा आणि तो आपल्या प्रेयसीच्या संपर्कात असल्याचा रवीला संशय आला.
मंगळवारी रात्री नेहमीच्या ठिय्यावर रवी, बंटी, मनोज, कैलास, संजय, छोटेलाल, प्रतिक आणि महेश हे सात जण दारू पीत बसले. रवीने ‘दुचाकी आणि प्रेयसी‘चा विषय काढताच त्याचे मनोजसोबत भांडण झाले. मनोजने सिमेंटची फळी उचलून रवीकडे धाव घेताच बंटी मध्ये आला. त्यामुळे मनोजने रवीला सोडून सिमेंटची फळी बंटीच्या डोक्यात घातली. त्यानंतर रवीला दगडाने ठेचले त्याने या दुहेरी हत्याकांडाची माहिती सर्वांनाच होती.
मात्र, कुणीही पोलिसांना कळविले नाही. एकटा मनोज दोघांची हत्या करू शकत नाही, असा संशय आल्यामुळे पोलिसांनी गुरुवारी शहारेला तर, शुक्रवारी उपरोक्त पाच आरोपींना अटक करून त्यांचा पीसीआर मिळवला. (प्रतिनिधी)

Web Title: Double murder, five junk robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.