शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  पूल डेबल डेकर दिसणार ट्रिपल डेकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 21:07 IST

मेट्रो रेल्वेच्या उत्तर-दक्षिण मार्गावर गड्डीगोदाम चौक ते आॅटोमोटिव्ह चौकापर्यंत ४.५ कि़मी. लांबीचा डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे. या मार्गावर गड्डीगोदाम चौकापुढे रेल्वेचा पूल आडवा गेल्यामुळे त्यावर बांधण्यात येणारा डबल डेकर पूल ट्रिपल डेकरसारखा दिसणार आहे. या ठिकाणी मेट्रो रेल्वे जमिनीपासून तब्बल २६ मीटर उंच अंतरावरून धावणार आहे.

ठळक मुद्देमेट्रो रेल्वे : गड्डीगोदामपुढे २६ मीटर उंचावरून धावणार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेट्रो रेल्वेच्या उत्तर-दक्षिण मार्गावर गड्डीगोदाम चौक ते आॅटोमोटिव्ह चौकापर्यंत ४.५ कि़मी. लांबीचा डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे. या मार्गावर गड्डीगोदाम चौकापुढे रेल्वेचा पूल आडवा गेल्यामुळे त्यावर बांधण्यात येणारा डबल डेकर पूल ट्रिपल डेकरसारखा दिसणार आहे. या ठिकाणी मेट्रो रेल्वे जमिनीपासून तब्बल २६ मीटर उंच अंतरावरून धावणार आहे.डबल डेकर दीड ते दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. पुलाचे बांधकाम आॅटोमोटिव्ह चौक आणि कडबी चौकात सुरू झाले आहे. याच मार्गावर रिझर्व्ह बँक चौक आणि एलआयसी चौक या दोन्ही वर्दळीच्या ठिकाणी लोकांना रस्ता ओलांडण्यासाठी १०-१० मीटरचे दोन भूमिगत पादचारी मार्ग बांधण्यात येणार आहे.वाहतुकीसाठी भूमिगत मार्गाचा प्रस्ताव रद्दगेल्या वर्षी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मॉरिस कॉलेज चौक ते गड्डीगोदाम चौकापर्यंत चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी भूमिगत मार्गाचा प्रस्ताव ठेवला होता. रेल्वेची कंपनी राईट्सने या मार्गाचे सर्वेक्षण करून मेट्रो रेल्वेकडे अहवाल दिला होता. या भूमिगत मार्गासाठी जवळपास ६०० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते. हा मार्ग खर्चिक आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्यामुळे भूमिगत मार्गाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला होता. पण ४.५ कि़मी. डबल डेकरचा प्रस्ताव ‘जैसे थे’ ठेवण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मेट्रो रेल्वे डबल डेकरचे बांधकाम करीत आहे. तसेच बांधकामासाठी येणारा खर्च प्राधिकरण मेट्रो रेल्वेला देणार असल्याचा उल्लेख महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी पत्रकारांशी बोलताना वारंवार केला आहे.वर्धा रोडवर डबल डेकरचे बांधकाम वेगातमेट्रो रेल्वेचा उत्तर-दक्षिण मार्ग आॅटोमोटिव्ह चौक, कडबी चौक, गड्डीगोदाम चौक, एलआयसी चौक, कस्तूरचंद पार्क, झिरो माईल्स, व्हेरायटी चौक, अभ्यंकर रोड, मुंजे चौक, धंतोली रोड, काँग्रेसनगर चौक, अजनी रेल्वे स्टेशन, जेल रोड, रहाटे कॉलनी चौक, अजनी चौक, साई मंदिर, छत्रपती चौक मार्गे प्राईड हॉटेलसमोरून मिहान डेपो आणि पुढे दोन स्टेशन असा राहणार आहे. वर्धा रोडवर अजनी चौकापासून सोनेगाव पोलीस ठाण्यापर्यंत डबल डेकरचे बांधकाम वेगात सुरू आहे. काही ठिकाणी पिलर उभारण्यात येत आहेत, तर बहुतांश ठिकाणी गर्डर टाकण्यात आले आहेत. या शिवाय मनीषनगरचा उड्डाण पूल वर्धा मार्गावरील डबल डेकरला जोडण्यात येणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर