कोरोना संक्रमण झाल्यास काय करावे आणि काय करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:09 IST2021-04-04T04:09:12+5:302021-04-04T04:09:12+5:30

प्रश्न : कोणते रुग्ण जास्त गंभीर होत आहेत? अनुभवानुसार उच्च रक्तदाब, मधुमेह, सीओपीडी आणि दमा असलेले रुग्ण जास्त गंभीर ...

Do's and don'ts of corona infection | कोरोना संक्रमण झाल्यास काय करावे आणि काय करू नये

कोरोना संक्रमण झाल्यास काय करावे आणि काय करू नये

प्रश्न : कोणते रुग्ण जास्त गंभीर होत आहेत?

अनुभवानुसार उच्च रक्तदाब, मधुमेह, सीओपीडी आणि दमा असलेले रुग्ण जास्त गंभीर होत आहेत. त्यांना गंभीर स्थितीचा सामना करावा लागत आहे. बायपास सर्जरी वा रेनल ट्रान्सप्लांटमधून गेलेलेही संकटात आहेत. लठ्ठपणा आणि हृदयविकार असलेल्या लोकांनाही कोविड आजाराचे नेहमीच संकट असते.

प्रश्न : युवा लोकसंख्येचे काय?

२० ते ४० वयोगटातील लोकांचे आरोग्य सुदृढ असते; परंतु मधुमेह आणि धूम्रपानाची जुनी सवय असलेल्या लोकांना व्हायरल न्यूमोनियाचे गंभीर संकट उद्भवू शकते.

प्रश्न : कोविड रुग्णाची स्थिती गंभीर होण्यापासून वाचविण्यासाठी काय करावे?

लवकरच वैद्यकीय उपचार आवश्यक आहे. थोडे फार लक्षण असल्यानंतरही उपचारात उशीर करू नये. विशेषत: वयस्क लोकांना उपचार महत्त्वाचा असतो. काही निवड प्रकरणांमध्ये अ‍ॅन्टी व्हायरस ड्रग्ज, स्टेरॉयड्स, प्रोफिलेक्टिक अ‍ॅन्टी बॅक्टेरियल ड्रग्स मृत्यू टाळण्यास महत्त्वाचे ठरत आहेत.

प्रश्न : रुग्णांना घरी गंभीर होण्यापासून वाचविण्यासाठी काय करावे?

दिवसात चारदा शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन योग्य असल्याची तपासणी आवश्यक आहे. सतत चार दिवसांपर्यंत ताप आणि ऑक्सिजन सॅच्युरेशनची टक्केवारी ९४ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास रुग्णालयात जाण्याची तयारी करावी. याकरिता तुमच्याकडे एक थर्मामीटर आणि पल्स ऑक्सिमीटर असणे आवश्यक आहे. वयस्कांना तातडीने रुग्णालयात नेण्याची शिफारस करण्यात येते.

प्रश्न : कोरोना व्हायरस संक्रमणाने मृत्यू कसा टाळता येऊ शकतो?

सुरुवातीलाच तातडीने होणारा उपचार संक्रमणाला गंभीर होण्यापासून टाळता येऊ शकतो. स्टेरॉयड्स रेमडेसीविर आणि टॉसिलुजिमॅबचा उपयोग काही रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतो.

प्रश्न : कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर व्हिटॅमिन्स, झिंक आणि थेरपीच्या अन्य पद्धतीची माहिती काय?

त्याची भूमिका केवळ सहायक ठरते. गैर-परंपरागत उपचार पद्धती केवळ योग्य दिशेत उपचारात उशीर होण्याचे कारण बनू शकते.

प्रश्न : होम क्वारंटाईन संदर्भात माहिती काय?

कोरोना व्हायरसची दुसरी लाट अत्यंत संक्रमक आहे. काही दिवसांतच संपूर्ण कुटुंब संक्रमित होत आहेत. आम्हाला अत्यंत गांभीर्याने या स्थितीचा सामना करायचा आहे. कुटुंबातील पहिली व्यक्ती संक्रमित झाल्यास त्याला तातडीने क्वारंटाईन करावे. त्यामुळे कुटुंबातील अन्य कुटुंब घरीच एन-९५ मास्क आणि त्यावर आणखी एक मास्क लावावा. कुटुंबातील सर्व गैर-संक्रमित सदस्यांनी लवकरात लवकर व्हॅक्सिनेशन करून घ्यावे.

प्रश्न : घरातील सदस्यांना गंभीर संक्रमणापासून कसे वाचवावे?

उपचार तातडीने सुरू करून घरीच संपूर्ण बारकाईने रुग्ण व अन्य सदस्यांवर लक्ष ठेवावे. जास्त जोखीम असलेल्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात भरती करावे.

प्रश्न : हॅप्पी हायपोक्सिया काय आहे?

हा दिशाभूल करणार असतो आणि त्याला सायलेंट हायपोक्सियासुद्धा म्हटले जाते. अनेक रुग्णांची ऑक्सिजन सॅच्युरेशन टक्केवारी ९० च्या खाली जाऊनही त्यांना श्वास घेण्यास त्रास होत नाही. त्यावेळी ताप, खोकला आणि चव वा वास जाणे ही मुख्य लक्षणे असतात. असे रुग्ण रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याची ऑक्सिजन सॅच्युरेशन टक्केवारी ८० टक्क्यांपर्यंत खाली आली असते. सोबतच व्हायरल न्यूमोनियाही होतो. त्यामुळे रुग्णाच्या फुफ्फुसाचा ९० टक्के भाग प्रभावित झालेला असतो. ऑक्सिजनचा स्तर एवढा कमी झाल्यानंतरही व्यक्ती आजारी वाटत नाही. त्यामुळे घरीच ऑक्सिजनची मॉनिटरिंग अत्यंत आवश्यक आहे. ऑक्सिजन सॅच्युरेशन टक्केवारी ९५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास रुग्णालयाशी संपर्क साधावा.

प्रश्न : रुग्णालयात बेड कमी आहेत. अशा स्थितीत आवश्यकतेनुसार कोरोना रुग्णांवर उपचार कसा होणार?

अनेक रुग्णांची रुग्णालयात भरती होण्याची इच्छा नसते. अनेक रुग्ण माहिती असलेल्या सेंटरमध्येच भरती होण्यास इच्छुक असतात. हे प्रत्येकवेळी शक्य होत नाही आणि हेच उशिराने उपचार मिळाल्याचे कारण बनते. सध्याच्या स्थितीत जागा मिळालेल्या रुग्णालयात भरती व्हावे. त्यामुळे उपचार तातडीने सुरू होऊ शकतो.

Web Title: Do's and don'ts of corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.