अफवांवर विश्वास ठेवू नका, लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:32+5:302021-04-30T04:10:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : आराेग्य विभागामार्फत ४५ वर्षांवरील नागरिकांचे काेविड लसीकरण सुरू आहे. परंतु रामटेक तालुक्यात लसीकरणाबाबत अनेक ...

अफवांवर विश्वास ठेवू नका, लसीकरण करा
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : आराेग्य विभागामार्फत ४५ वर्षांवरील नागरिकांचे काेविड लसीकरण सुरू आहे. परंतु रामटेक तालुक्यात लसीकरणाबाबत अनेक गैरसमज व अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवा खाेट्या व दिशाभूल करणाऱ्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शासकीय लसीकरण केंद्रावर जाऊन लस टाेचून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले.
तालुक्यात गावनिहाय ५० ते ६० कुटुंबांमार्फत कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी गावामध्ये सातत्याने लसीकरणाबाबत जनजागृती करीत आहेत. शिवाय, लसीकरण एकदम सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती मजबूत हाेते आणि त्यानंतर रुग्ण पाॅझिटिव्ह आला तरी जीवितहानी टाळली जाते. याउलट लस न घेतल्यास धाेका अधिक असताे. काेराेनाबाधित हाेऊन मृत्यूही हाेऊ शकताे. त्यामुळे प्रत्येकांनी काेविड लस घ्यावी आणि स्वत:सह आपल्या कुटुंबाला सुरक्षित करावे, असेही आवाहन तहसीलदारांनी यावेळी केले.
रामटेक तालुक्यात २९ एप्रिल ते १ मेदरम्यान विशेष लसीकरण माेहीम राबविली जाणार आहे. यामध्ये मनसर, खैरी बिजेवाडा, करवाही, देवलापार, लाेधा, भंडारबाेडी, मुसेवाडी, महादुला, हिवराबाजार, पवनी, बेलदा, पथरई, नगरधन डाेंगरी, चिचाळा व काचूरवाही या गावाचा समावेश आहे. गावागावात जनजागृती माेहीम राबविली जाणार आहे.