शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला घाबरू नका, मनपा करणार समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 23:47 IST

कोरोना विषाणूची भीती घालविण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून आता महापालिकेच्या तज्ज्ञांची चमू आणि प्रख्यात मानसोपचारतज्ज्ज्ञ समुपदेशन करणार आहेत.

ठळक मुद्देतुकाराम मुंढे यांचा पुढाकार : समुपदेशनासाठी तज्ज्ञांची चमू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या संकटाने संपूर्ण देश हादरला आहे. यामुळे नेमके काय होईल, किती दिवस लॉकडाऊन राहील, नोकरी तर जाणार नाही ना, आर्थिक आधार तर खचणार नाही, अशी भीती व प्रश्न निर्माण झाले आहेत. ही भीती घालविण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून आता महापालिकेच्या तज्ज्ञांची चमू आणि प्रख्यात मानसोपचारतज्ज्ज्ञ समुपदेशन करणार आहेत. आयुक्तांनी एकीकडे कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आरोग्य विभागासोबतच मनपाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज उभारली आहे. विषाणूशी लढा देतानाच दुसरीकडे सामाजिक दायित्वही गरजूंना, बेघरांना मदत पोहचवून निभावत आहे. लॉकडाऊनदरम्यान शहरातील कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी त्यांनी किराणा, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळेल अशी व्यवस्था केली. तर गरजूंना किराणा किट, निराधार ज्येष्ठ व्यक्ती, दिव्यांग, नागपुरात अडकलेले विद्यार्थी, मजूर आदींना समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दोन वेळेचे भोजन पुरविले जात आहे. नागरिकांच्या आरोग्यावर सर्वेक्षणाच्या माध्यमातून बारीक नजर ठेवली जात आहे. अनेकांच्या मनात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे तुकाराम मुंढे यांच्या लक्षात आले. एकीकडे आरोग्याची भीती आणि दुसरीकडे आर्थिक कंबरडे मोडण्याची भीती अशा दुहेरी शंकांमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे ओळखून त्यांनी मनपाच्या दहाही झोनमध्ये समाजकल्याण विभागाच्या मार्फत सुरू असलेल्या समुपदेशन केंद्राचा यासाठी उपयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता नागरिकांना अशी कुठली भीती मनात असेल तर त्यांनी मनपाच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून संपूर्ण माहिती द्यावी. तेथे उपस्थित डॉक्टरांची चमू नागरिकांचे समुपदेशन करेल. गरज पडल्यास झोनच्या चमूला संबंधित व्यक्तीच्या घरी पाठविण्यात येईल. याशिवाय अत्यंत आवश्यकता भासल्यास शहरातील प्रख्यात मानसोपचारतज्ज्ज्ञसुद्धा समुपदेशन करतील. नागरिकांनी या समुपदेशन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे.तर समुपदेशनासाठी करा कॉलकोविड संदर्भातील भीती आणि अन्य शंका असतील तर समुपदेशनासाठी नागपूर महानगरपालिका नियंत्रण कक्षात दूरध्वनी करावा. ०७१२-२५६७०२१, ०७१२-२५६२४७४। ०७१२-२५६१८६६ या क्रमांकावर दूरध्वनी करून समुपदेशन सेवेचा लाभ घेता येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका