लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वडील आणि पत्नीसोबत कडाक्याचा वाद करून गोंधळ निर्माण करणाऱ्या एका आरोपीने समजावण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचाºयाला अश्लील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. एवढेच नव्हे तर त्याला पाहून घेण्याचीही धमकी दिली.गुरुवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आरोपीचे नाव नितीन अनिल पारोचे (वय ३६) आहे. तो कोलबास्वामी नगरात राहतो. आरोपी नितीन पारोचे हा गुरुवारी सकाळी त्याच्या पत्नीसोबत भांडण करत होता. त्याचे वडील समजावयाला आले असता त्यांच्याशीही त्याने कडाक्याचे भांडण केले. काही आक्रित घडू नये म्हणून शेजाºयाने नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. नियंत्रण कक्षाने गिट्टीखदान पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. या पथकातील पोलीस हवालदार रोनॉल्ड मार्टिन यांनी आरोपीला शांत करून पोलिसांच्या वाहनात बसायला सांगितले. आरोपीने त्यावरून रोनॉल्ड यांना शिवीगाळ करून त्यांच्याशी वाद सुरू केला. एवढेच नव्हे तर त्यांना धक्काबुक्की करून तुझी नोकरी खाईल, अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला वाहनात बसवलेआणि पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
घरगुती भांडणाचा राग काढला पोलिसावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:48 IST
वडील आणि पत्नीसोबत कडाक्याचा वाद करून गोंधळ निर्माण करणाऱ्या एका आरोपीने समजावण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचाºयाला अश्लील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. एवढेच नव्हे तर त्याला पाहून घेण्याचीही धमकी दिली.
घरगुती भांडणाचा राग काढला पोलिसावर!
ठळक मुद्देधक्काबुक्की करून धमकी : गिट्टीखदानमध्ये घडली घटना