Domestic gas cylinder market in the subcontinent | उपराजधानीत घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार

उपराजधानीत घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार

ठळक मुद्देदलालांची टोळी सक्रियसबसिडीचे सिलिंडर एक हजारात

आशीष दुबे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या सबसिडीच्या घरगुती गॅस सिलिंडरची कोणताही ‘वेटिंग लिस्ट’ नाही. ग्राहकाने केव्हाही सिलिंडरची नोंदणी करावी आणि घरी न्यावे, असा दावा शहर आणि जिल्ह्यातील गॅस सिलिंडर एजन्सीच्या संचालकांचा आहे. त्यानंतरही अनेक ग्राहकांना सिलिंडरकरिता पाच ते सहा दिवसांची वाट पाहावी लागत आहे.
‘लोकमत’ने या प्रकरणाची तपासणी केली. त्यात अनेक आश्चर्यजनक बाबी पुढे आल्या आहेत. त्यानुसार शहर आणि जिल्ह्यात सबसिडीच्या घरगुती सिलिंडरचा सर्रास काळाबाजार होत आहे. दुसरीकडे ग्राहकांना सिलिंडरसाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे. केंद्र सरकारने सबसिडीच्या घरगुती सिलिंडरचा काळाबाजार थांबविण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.
आॅनलाईन बुकिंग पद्धत सुरू केली. त्यानंतरही नागपूर शहर आणि जिल्ह्यात दलालांची टोळी सक्रिय असून सबसिडीच्या घरगुती सिलिंडरचा सर्रास काळाबाजार करीत आहे. जिल्हा प्रशासन आणि गॅस कंपन्यांनी आतापर्यंत कोणत्याही दलालावर कारवाई केलेली नाही. काळाबाजार करणाऱ्या दलालांची मोठी साखळी आहे. दलालांची टोळी सिलिंडरचा पुरवठा करणाºया गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांसोबत संगनमत करून या बाबी प्रत्यक्षात आणत आहेत. या संदर्भात काही गॅस एजन्सीच्या संचालकांनुसार, गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आॅनलाईन झाली आहे. अशा स्थितीत सबसिडीच्या घरगुती सिलिंडरचा काळाबाजार होणे शक्य नाही. पण सत्य स्थिती अशी आहे की, दलालांची टोळी संघटितरीत्या हे काळेकृत्य पूर्णत्वास नेत आहे.

८५२ रुपयांचे सिलिंडर मिळते एक हजारात
सबसिडीचे घरगुती गॅस सिलिंडर ८५२ रुपयात तर व्यावसायिक गॅस सिलिंडर १४०० ते १५०० रुपयात मिळते. पैशाची बचत करण्यासाठी अनेक हॉटेल्स, चहाटपरी, ढाबा, लग्न व समारंभात कॅटरिंगचे कंत्राट घेणारे दलालांसोबत संपर्क साधतात. त्यांना घरगुती गॅस सिलिंडर एक हजार ते ११०० रुपयात मिळते. त्यांची पैशाची बचत होते.
त्यामुळे दलालांसोबत संपर्क साधणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याची प्रकरणे पुढे न आल्याने या काळाबाजारीचा खुलासा होऊ शकला नाही.
दलाल याचाच फायदा घेतात. त्यांना सबसिडीचे पैसे मिळवून देण्याची बतावणी करतात. त्यांच्या नावावर गॅस सिलिंडरचे बुकिंग करतात. सबसिडीची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर त्यातील काही वाटा ज्यांच्या नावावर सिलिंडरची बुकिंग करण्यात येते, त्यांना देण्यात येतो. उर्वरित पैसे दलाल आपल्याकडे ठेवतात. सर्वसाधारणपणे एक दलाल दररोज १० ते १५ सिलिंडरची दलाली करतो. लग्न व समारंभाच्या दिवसात दलाल २० ते २५ सिलिंडरचा काळाबाजार करतो.

गरीब व मजुरांच्या नावावर बनतात कार्ड
सबसिडीचे गॅस सिलिंडर खरेदीसाठी ग्राहकाला गॅस कंपनीच्या एका मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून एलपीजी सिलिंडरची बुकिंग करावी लागते. सिलिंडर मिळाल्यानंतर ग्राहकाला रक्कम चुकती करावी लागते. सबसिडीची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होते. अनेक गरीब आणि मजूर आहेत की त्यांना गॅस सिलिंडरची आवश्यकता नसते.

सिलिंडर बॉयला माहीत असते सिलिंडर पोहोचविण्याचे ठिकाण
याप्रकारे अवैध व्यवहार विनाझंझट सहजरीत्या पूर्ण केले जातात. सिलिंडर कुणाच्याही पत्त्यावर असो, पण दलालाचा आर्थिक व्यवहार ज्यांच्यासोबत होतो, त्यांच्याच घरी सिलिंडर पोहोचतो. सिलिंडरच्या बुकिंगनंतर डिलिव्हरी करताना सिलिंडर कोणत्या पत्त्यावर पोहोचवायचे आहे, याची परिपूर्ण माहिती एजन्सीचे कर्मचारी अर्थात सिलिंडर बॉयला असते. दलालाचे सिलिंडर खºया ग्राहकाच्या घरी न पोहोचता दलालाने आर्थिक व्यवहार केलेल्याच्या घरी पोेहोचते.

सहजपणे पूर्णत्वास नेतात काम
माहितीनुसार दलाल घरगुती सिलिंडर आपल्या घरी वा कोणत्याही सुरक्षित ठिकाणी स्टोर करून ठेवतात. कारवाईचा अंदाज पाहता सर्व सिलिंडरला एका ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतात. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी एक वा दोन सिलिंडर ठेवतात.

Web Title: Domestic gas cylinder market in the subcontinent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.