शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

२३ हजार लोकांना श्वानदंश : तीन वर्षातील आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 9:45 PM

श्वान दंशाचे प्रकरण वाढले आहे. एप्रिल २०१७ ते जून २०१९ या तीन वर्षात तब्बल २३ हजार ६८८ लोकांना श्वानदंश झाला. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ११ हजार ६३३ तर या वर्षी एप्रिल ते जून महिन्यात २ हजार १९५ लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे.

ठळक मुद्देमोकाट कुत्र्यांवर नियंत्रण कुणाचे?

लोकमत न्यूज नेटवर्कनागूपर : भारतात ‘रॅबिज’मुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील ‘रॅबिज’च्या तुलनेत देशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात महानगरपालिका गंभीर नाही. यामुळे श्वान दंशाचे प्रकरण वाढले आहे. एप्रिल २०१७ ते जून २०१९ या तीन वर्षात तब्बल २३ हजार ६८८ लोकांना श्वानदंश झाला. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ११ हजार ६३३ तर या वर्षी एप्रिल ते जून महिन्यात २ हजार १९५ लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. विशेष म्हणजे यात, १५ वर्षांखालील बालकांची संख्या मोठी आहे. या आकडेवारीवरून मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न, उपस्थित केला जात आहे.गल्लीबोळापासून ते रस्त्यावर मोठ्या संख्येत कुत्री दिसून येतात. मोकाट कुत्र्यांची ही संख्या साडेतीन लाखांच्या आसपास आहे. रात्रपाळी करून घरी परतणाऱ्या नागरिकांच्या अंगावर हीच मोकाट कुत्री धावून जातात. यातून अपघातासोबतच श्वानदंशाचे प्रमाण वाढले आहे. मनपाच्या कोंडवाडा विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत ९ हजार ८६० लोकांना श्वानदंश झाला. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत ११ हजार ६३३ तर एप्रिल २०१९ ते जून २०१९ या तीन महिन्यात २ हजार १९५ श्वानदंश झाला. सरासरी दर आठवड्यात चार ते पाच जणाला कुत्रा चावत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, रुग्ण मनपाच्या दवाखान्यासह मेडिकल, मेयोत येतात. मनपाचे आरोग्य अधिकारी (मेडिसीन) डॉ. सरिता कामदार यांच्याकडे मनपाच्या इस्पितळांची जबाबदारी येताच नुकतेच १४ इस्पितळांमध्ये नि:शुल्क रेबीज इंजेक्शन देण्याची सोय केली. याचा मोठा फायदा होताना दिसून येत आहे. परंतु मेयो, मेडिकलमध्ये याच्या उलट चित्र आहे. येथे केवळ दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांनाच नि:शुल्क इंजेक्शन दिल्या जाते, इतरांना बाहेरून विकत घेण्यास सांगितले जाते.७ महिन्यात ३५०० कुत्र्यांची नसबंदीमोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महानगरपालिकेने नसबंदीची मोहीम २००६ पासून हाती घेतली. २०१० पर्यंत मोठ्या संख्येत कुत्र्यांवर नसबंदी करण्यात आली. परंतु नंतर ही जबाबदारी शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूरकडे सोपविण्यात आली. त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे २०१७ मध्ये ‘एसपीसीए’ या संस्थेकडे जबाबदारी देण्यात आली. या संस्थेने २८० श्वानांची नसबंदी केली. याच दरम्यान चार श्वानांचा मृत्यू झाला. एका पशुवैद्यकीय डॉक्टरवर गुन्हाही दाखल झाला. परिणामी, नसबंदीची प्रक्रिया बंद पडली. आता १४ फेब्रुवारी २०१९ पासून मनपाने पुन्हा नसबंदीची मोहीम सुरू केली आहे. या सात महिन्यात ३ हजार ५०० कुत्र्यांची नसबंदी व त्यांना रॅबीजची लस देण्यात आली आहे.श्वानदंशाचे सर्वाधिक रुग्ण महाल दवाखान्यातगेल्या तीन वर्षात श्वानदंशाचे सर्वाधिक रुग्ण मनपाच्या महाल दवाखान्यात आले आहे. १० हजार ५०३ रुग्णांनी या दवाखान्यातून रॅबीजची लस घेतली. या शिवाय, पाचपावली सुतिकागृह दवाखान्यातून ४ हजार ६५०, सदर दवाखान्यातून ४ हजार १९४, इंदिरा गांधी हॉस्पिटल, गांधीनगर येथे २ हजार ९६९, चकोल दवाखान्यात १ हजार ६८, आयसोलेशन दवाखान्यात ३०१ तर सतरंजीपुरा दवाखान्यात ३ जणांना लस देण्यात आली.श्वान नसबंदी व रॅबीज लसीकरणमहानगरपालिकेच्यावतीने १४ फेब्रुवारीपासून श्वानांच्या नसबंदीची मोहीम सुरू झाली आहे. आतापर्यंत ३५०० कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. सोबतच श्वानांना रॅबीजची लस दिली जात आहे. यामुळे याचा फायदा येत्या काळात दिसून येईल.डॉ. गजेंद्र महल्लेपशुचिकित्सा अधिकारी, कोंडवाडा विभाग मनपा

टॅग्स :dogकुत्राnagpurनागपूर