२३ हजार लोकांना श्वानदंश : तीन वर्षातील आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 09:45 PM2019-09-27T21:45:19+5:302019-09-27T21:47:12+5:30

श्वान दंशाचे प्रकरण वाढले आहे. एप्रिल २०१७ ते जून २०१९ या तीन वर्षात तब्बल २३ हजार ६८८ लोकांना श्वानदंश झाला. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ११ हजार ६३३ तर या वर्षी एप्रिल ते जून महिन्यात २ हजार १९५ लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे.

Dog bite to 23,000 people: Statistics in three years | २३ हजार लोकांना श्वानदंश : तीन वर्षातील आकडेवारी

२३ हजार लोकांना श्वानदंश : तीन वर्षातील आकडेवारी

googlenewsNext
ठळक मुद्देमोकाट कुत्र्यांवर नियंत्रण कुणाचे?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागूपर : भारतात ‘रॅबिज’मुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील ‘रॅबिज’च्या तुलनेत देशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात महानगरपालिका गंभीर नाही. यामुळे श्वान दंशाचे प्रकरण वाढले आहे. एप्रिल २०१७ ते जून २०१९ या तीन वर्षात तब्बल २३ हजार ६८८ लोकांना श्वानदंश झाला. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ११ हजार ६३३ तर या वर्षी एप्रिल ते जून महिन्यात २ हजार १९५ लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. विशेष म्हणजे यात, १५ वर्षांखालील बालकांची संख्या मोठी आहे. या आकडेवारीवरून मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न, उपस्थित केला जात आहे.
गल्लीबोळापासून ते रस्त्यावर मोठ्या संख्येत कुत्री दिसून येतात. मोकाट कुत्र्यांची ही संख्या साडेतीन लाखांच्या आसपास आहे. रात्रपाळी करून घरी परतणाऱ्या नागरिकांच्या अंगावर हीच मोकाट कुत्री धावून जातात. यातून अपघातासोबतच श्वानदंशाचे प्रमाण वाढले आहे. मनपाच्या कोंडवाडा विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत ९ हजार ८६० लोकांना श्वानदंश झाला. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत ११ हजार ६३३ तर एप्रिल २०१९ ते जून २०१९ या तीन महिन्यात २ हजार १९५ श्वानदंश झाला. सरासरी दर आठवड्यात चार ते पाच जणाला कुत्रा चावत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, रुग्ण मनपाच्या दवाखान्यासह मेडिकल, मेयोत येतात. मनपाचे आरोग्य अधिकारी (मेडिसीन) डॉ. सरिता कामदार यांच्याकडे मनपाच्या इस्पितळांची जबाबदारी येताच नुकतेच १४ इस्पितळांमध्ये नि:शुल्क रेबीज इंजेक्शन देण्याची सोय केली. याचा मोठा फायदा होताना दिसून येत आहे. परंतु मेयो, मेडिकलमध्ये याच्या उलट चित्र आहे. येथे केवळ दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांनाच नि:शुल्क इंजेक्शन दिल्या जाते, इतरांना बाहेरून विकत घेण्यास सांगितले जाते.

७ महिन्यात ३५०० कुत्र्यांची नसबंदी
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महानगरपालिकेने नसबंदीची मोहीम २००६ पासून हाती घेतली. २०१० पर्यंत मोठ्या संख्येत कुत्र्यांवर नसबंदी करण्यात आली. परंतु नंतर ही जबाबदारी शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूरकडे सोपविण्यात आली. त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे २०१७ मध्ये ‘एसपीसीए’ या संस्थेकडे जबाबदारी देण्यात आली. या संस्थेने २८० श्वानांची नसबंदी केली. याच दरम्यान चार श्वानांचा मृत्यू झाला. एका पशुवैद्यकीय डॉक्टरवर गुन्हाही दाखल झाला. परिणामी, नसबंदीची प्रक्रिया बंद पडली. आता १४ फेब्रुवारी २०१९ पासून मनपाने पुन्हा नसबंदीची मोहीम सुरू केली आहे. या सात महिन्यात ३ हजार ५०० कुत्र्यांची नसबंदी व त्यांना रॅबीजची लस देण्यात आली आहे.
श्वानदंशाचे सर्वाधिक रुग्ण महाल दवाखान्यात
गेल्या तीन वर्षात श्वानदंशाचे सर्वाधिक रुग्ण मनपाच्या महाल दवाखान्यात आले आहे. १० हजार ५०३ रुग्णांनी या दवाखान्यातून रॅबीजची लस घेतली. या शिवाय, पाचपावली सुतिकागृह दवाखान्यातून ४ हजार ६५०, सदर दवाखान्यातून ४ हजार १९४, इंदिरा गांधी हॉस्पिटल, गांधीनगर येथे २ हजार ९६९, चकोल दवाखान्यात १ हजार ६८, आयसोलेशन दवाखान्यात ३०१ तर सतरंजीपुरा दवाखान्यात ३ जणांना लस देण्यात आली.

श्वान नसबंदी व रॅबीज लसीकरण
महानगरपालिकेच्यावतीने १४ फेब्रुवारीपासून श्वानांच्या नसबंदीची मोहीम सुरू झाली आहे. आतापर्यंत ३५०० कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. सोबतच श्वानांना रॅबीजची लस दिली जात आहे. यामुळे याचा फायदा येत्या काळात दिसून येईल.
डॉ. गजेंद्र महल्ले
पशुचिकित्सा अधिकारी, कोंडवाडा विभाग मनपा

Web Title: Dog bite to 23,000 people: Statistics in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.