शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्वानांचे हल्ले वाढले; मुलं ‘सॉफ्ट टार्गेट’ का ठरत आहेत?

By निशांत वानखेडे | Updated: August 18, 2025 16:07 IST

मोठ्यांची श्वानांसोबत टवाळी चिमुकल्यांवर बेतते: मुलांना कसे सुरक्षित ठेवाल?

निशांत वानखेडेनागपूर : शनिवारी नागपुरात एका पाच वर्षाच्या मुलीवर चार-पाच स्वानांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. तीन दिवसांपूर्वी अशीच घटना वहगाव, मावळ येथे घडली. गेल्या वर्षीच नागपूर जिल्ह्याच्या काटोल येथे श्वानांच्या हल्ल्यात एका चिमुकल्याला प्राण गमवावे लागले. या गंभीर घटनांमुळे पालकांची चिंता वाढवली आहे. त्याचा एकूणच रोष स्वानांवर व्यकत होती. भारतात दरवर्षी श्वानांचे हल्ले व चावा घेतल्याने होणान्या रेबिज आजारामुळे १८ ते २० हजार लोकांचा मृत्यू होतो, ज्यामध्ये मूलांची संख्या अधिक असते. यामुळे श्वान लहान मुलांना 'टार्गेट' करतात का? कारण काय? श्वानांच्या कर्तणुकीत काही चदल झालेत काय, असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मोठ्यांची श्वानांसोबत टवाळी चिमुकल्यांवर बेतते: मुलांना कसे सुरक्षित ठेवाल?प्रशासन गंभीर नाही तज्ज्ञांच्या मते यामध्ये महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष हे गंभीर कारण आहे. प्रशासनाकडून प्रामाणिकपणे नसबंदी केली जात नाही, स्वानांचे लसीकरण होत नाही. त्यामुळे मोकाट स्वानांची संख्या भरमसाट वाढली आहे. संख्या नियंत्रणात नसल्याने अन्न तुटवडा व हल्ले वाढले आहेत. उपाय म्हणून एका परिसरातील स्वान दुसन्या भागात सोडणे, वामुळेसुद्धा त्यांच्यात आक्रमकता व अनैसर्गिक वर्तणूक तयार होत आहे.

प्रजननाच्या काळात श्वान आक्रमक होतातपशु चिकित्सक डॉ. पोहरकर यांनी सांगितले, हा सध्या श्वानांच्या प्रजननाचा काळ आहे. अशात ८-१० श्वान झुडीने वावरत असतात. या स्थितीत त्यांची उपासमार होत असते, ज्यामुळे ते चिडचिड करतात, आक्रमक होतात, मानसिक संतुलनावर परिणाम होतो. अशा वेळी लहान मुले कुत्रे पाहून भीतीपोटी पळण्याचा प्रयत्न करतात, घाबरतात, ही वर्तणूक श्वानांना आणखी आक्रमक करते व ते मुलांवर हल्ले करतात. प्रतिकार न करणारी मुले त्यांच्यासाठी 'सॉफ्ट टार्गेट' ठरतात. सर्वच श्वान नाही, पण एखादा आक्रमक असतो व इतर त्याचे अनुकरण करतात.

अन्नाअभावी चिडचिड, आक्रमकतामोकाट श्वानांची संख्या वाढली आहे. पूर्वीसारखे त्यांना खायला अन्न मिळत नाही. त्यांची शिकार करण्याची सवयही सुटत चालली आहे. काही कुत्र्यांच्या मनात धावणाऱ्या मुलांचे ओरडणे हे 'शिकार'सारखे असते व ते हमना करतात, असे डॉ. पोहस्कर यांनी सांगितले. खरूज किवा इतर आजारांमुळे त्यांच्यात चिडचिडपणा येतो व ते आक्रमक होतात,

मानवी वर्तणूक गंभीर कारणमहाराष्ट्र पशुवैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. पोहरकर यांच्या मते स्वानांच्या आक्रमकपणामागे मानवी वर्तणूक मोठे कारण आहे. तरुणांकडून स्थानांशी छेडछाड केली जाते. विविध प्रकारची खोडी केली आते. वाहनचालक मुद्दामपणे स्वानांना थडक देतात, लाथ मारतात, दुकानदारांकडूनही गरम तेल किंवा गरम पाणी त्याच्या अंगावर टाकण्याचे प्रकारही बघायला मिळतात. अशा घृणास्पद प्रकारामुळे श्वानांच्या मनात विशिष्ट वाहन, व्यक्तिबद्दल आक्रमकता निर्माण होते. ते सारख्या दिसणाऱ्या वाहनांवर धावून जातात. ही वर्तणूक लहान मुलांच्या जीवावर बेतते.

मुलांना सांभाळणे, जनजागृती हाच पर्यायस्वानांचे हल्ले रोखण्यासाठी जनजागृती हाच सर्वात मोठा पर्याय आहे. शाळांमध्ये मुलांची जागृती करणे, त्यांना प्राण्यांशी वागणुकीबाबत जागरूक यारणे महत्त्वाचे आहे. मोठ्यांनी श्वानांशी अनैसर्गिक वर्तणूक करू नये, कारण त्याचे परिणाम मुलांना भोगावे लागतात. विशेषतः तीन-चार वर्षांची मुले असलेल्या पालकांनी मुलांबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. प्रशासनाने नियमित लसीकरण व नसबंदी करून श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवावी.

टॅग्स :nagpurनागपूरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयdogकुत्रा