हे चालणार नाही!
By Admin | Updated: January 25, 2016 03:59 IST2016-01-25T03:59:18+5:302016-01-25T03:59:18+5:30
वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सध्या सुरक्षित वाहतुकीबाबात जनजागृती सुरू आहे. तरी वाहनचालक रोजच नियमांचे उल्लंघन

हे चालणार नाही!
वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सध्या सुरक्षित वाहतुकीबाबात जनजागृती सुरू आहे. तरी वाहनचालक रोजच नियमांचे उल्लंघन करतात. कधी स्पीडमध्ये तर कधी राँग साईड, कधी ट्रिपल सिट तर कधी लायसन्सविना वाहने चालवितात. रविवारी हा दुचाकीस्वार पोलिसदादांच्या तावडीत सापडला. गणेश टेकडी उड्डाणपुलावरून तो राँग साईड आला. पोलिसदादा समोरच. गाडी बाजूला केली आणि राँग साईड का आला, असा जाब विचारला. पोलिसदादांनी माफी नाही म्हणताच तो पाया पडू लागला. अखेर कारवाईचा कागद हाती देऊनच नियमानुसार त्याची सुटका झाली. पोलिसांचा असाच धाक राहिला तर शहरात सुरक्षित वाहतूक होताना दिसेल, हेही तितकेच खरे.