तापस घाेषकडील दस्तावेज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:25 IST2020-12-11T04:25:35+5:302020-12-11T04:25:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या वयोवृद्ध आईची अडीच कोटी रुपयाने फसवणूक केल्या प्रकरणात पोलिसांनी दस्तावेज ...

तापस घाेषकडील दस्तावेज जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या वयोवृद्ध आईची अडीच कोटी रुपयाने फसवणूक केल्या प्रकरणात पोलिसांनी दस्तावेज व चेकबुक जप्त केले आहे. या प्रकरणात अटकेत असलेला तापस घोष व त्याच्या पत्नीसह इतर लोक यात कसे सामील आहेत, हे पोलीस तपासून पाहत आहेत.
बोबडे परिवाराद्वारे संचालित सीझन्स लॉन येथे मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या तापसने पत्नीच्या मदतीने ही फसवणूक केली. २९ ऑगस्ट रोजी याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी एसआयटीच्या मााध्यमातून या प्रकरणाचा तपास केला. मंगळवारी रात्री सीताबर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. लोकमतनेच सर्वप्रथम हे प्रकरण उघडकीस आणले. पोलिसांनी तापसला अटक करून १६ डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडीत घेतले होते. तापसने फसवणूक करण्यासाठी बोगस दस्तावेज तयार केले. त्यांच्या माध्यमातून लॉनची बुकिंग करणारे, सामानाची खरेदी, देखभाल-दुरुस्ती आदींची कामे सांगून अपहार केला.
तापस हा सरन्यायाधीश शरद बाोबडे यांची आई मुक्ता बोबडे यांचे बँक खातेही संचालित करीत हाेता. त्यामुळे तो सहजपणे हे काम करू शकला. लॉकडाऊनदरम्यान तापस नियमितपणे रक्कम जमा करीत नसल्याने खरा प्रकार उघडकीस आला. यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेले.
सूत्रानुसार अटक केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तापसच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरातून फसवणुकीशी संबंधित दस्तावेज आणि चेकबुक जप्त करण्यात आले. तापसने अनेक बोगस दस्तावेज लोकांना दिले आहेत. विचारपूसदरम्यान अशा लोकांचाही शोध लागू शकतो. प्रकरण संवेदनशील असल्याने अधिकारी याबाबत अधिक बोलण्यास टाळाटाळ करीत आहेत.