भारतीय संविधान हक्क व अधिकारांचे दस्तऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:14 IST2017-10-24T00:14:00+5:302017-10-24T00:14:20+5:30

भारतीय संविधान हे आपल्या हक्क व अधिकारांचे दस्तऐवज आहे. हे समजून घ्या. संविधानाला पवित्र ग्रंथ बनवू नका. त्याचे दैवीकरण करू नका, कारण त्याला दैवत्व बहाल केले तर सर्वच काही संपून जाईल.

Documents of Rights and Rights of Indian Constitution | भारतीय संविधान हक्क व अधिकारांचे दस्तऐवज

भारतीय संविधान हक्क व अधिकारांचे दस्तऐवज

ठळक मुद्देवैशाली डोळस : संविधान व महापुरुषांचे दैवीकरण करू नका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय संविधान हे आपल्या हक्क व अधिकारांचे दस्तऐवज आहे. हे समजून घ्या. संविधानाला पवित्र ग्रंथ बनवू नका. त्याचे दैवीकरण करू नका, कारण त्याला दैवत्व बहाल केले तर सर्वच काही संपून जाईल. तसेच तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा दैवत्व बहाल करण्याच्या नादी लागू नका. ते महापुरुष आहेत. त्यांना महापुरुषच राहू द्या, असे रोखठोक मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा वैशाली डोळस यांनी येथे केले.
१९४२ च्या महिला क्रांती परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लॉर्ड बुद्धा मैत्री संघ व संथागार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमीवर तीन दिवसीय अ.भा. महिला क्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी या परिषदेच्या दुसºया दिवशी मागासवर्गीय व अल्पसंख्याक महिला आणि भारतीय संविधान या विषयावर पहिले चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
वैशाली डोळस म्हणाल्या, प्रगतशील समजल्या जाणाºया इंग्लंडमधील महिलांना मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी आंदोलन करावे लागले. परंतु भारतातील महिलांना हा अधिकार संविधानाने न मागता बहाल केलेला आहे, ही महत्त्वाची बाब समजून घेतली पाहिजे. भारतीय संविधानाने आपल्याला सर्व काही दिले आहे. महिलांनी संविधानाचा अभ्यास करावा. आपले अधिकारी व हक्क काय हे जाणून घ्यावे तेव्हाच खºया अर्थाने आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ समजेल. संविधानाने अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. हे स्वातंत्र्य कुणी हिरावून घेत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उचला, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
यवतमाळच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुनंदा वालदे यांनी महिलांचे अधिकार आपल्या घरातही नाकारले जात असल्याचा मुद्द उपस्थित करीत याविरुद्ध घारापासूनच आवाज उचलण्याचे आवाहन केले. दिल्लीतील सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. निर्मला सोनी यांनी महिलांनी मानसिक व धार्मिक गुलामीतून स्वतंत्र होण्याचे आवाहन केले.कर्नाटकच्या ज्योती सत्यशीला यांनी देशात विविध भागात दलितांवर अन्याय हेतो, अशावेळी देशभरातील दलितांनी एकत्र येऊन आवाज उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.
ममता बोदेले यांनी संचालन केले डॉ. वृषाली रणधीर यांनी आभार मानले.

Web Title: Documents of Rights and Rights of Indian Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.