‘डॉक्टर्स डे’ला डॉक्टरांचे सामूहिकराजीनामे
By Admin | Updated: June 29, 2014 00:39 IST2014-06-29T00:39:23+5:302014-06-29T00:39:23+5:30
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) विविध मागण्याला घेऊन शासन गंभीर नाही. याच्याविरोधात १ जुलै रोजी राज्यातील वैद्यकीय अधिकारी सामूहिक राजीनामे देणार

‘डॉक्टर्स डे’ला डॉक्टरांचे सामूहिकराजीनामे
मॅग्मो संघटना : बेमुदत उपोषणही
नागपूर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) विविध मागण्याला घेऊन शासन गंभीर नाही. याच्याविरोधात १ जुलै रोजी राज्यातील वैद्यकीय अधिकारी सामूहिक राजीनामे देणार असून मॅग्मो संघटनेचे पदाधिकारी मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीला घेऊन शासन अन्याय करीत आहे. केंद्र सरकार तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी या मागणीला घेऊन मॅग्मो संघटनेने आतापर्यंत अनेकवेळा आंदोलन उभारले, परंतु दरवेळी आश्वासनेच मिळाली. याच्याविरोधात २६ मे पासून असहकार आंदोलन सुरू केले. यात राज्यातील १२ हजार तर विदर्भातील ३ हजार ५०० वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. याची दखल खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली. त्यांनी २ जून रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. १० दिवसांत संघटनेच्या मागण्या मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आश्वासन दिले. परंतु २५ दिवस होऊनही आरोग्य विभागाने या संदर्भातील फाईलच तयार केली नाही. या संदर्भात नुकतेच मॅग्मोचे पदाधिकारी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांची भेट घेतली, परंतु त्यांनी फाईल तयार करायला उशीर होणार असल्याची माहिती दिली. शासन मागण्यांना घेऊन गंभीर नसल्याचे पाहत ‘डॉक्टरर्स डे’ रोजी सामूहिक राजीनामे देण्याच्या आणि आझाद मैदानावर संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रमोद रक्षमवार आणि राज्य अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी बेमुदत उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतला.