शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

शहराचा नावलौकिक होईल असे कार्य करा : महापौर नंदा जिचकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:30 PM

शहराच्या स्वच्छतेमध्ये सफाई कामगारांचे महत्त्वाचे योगदान आहे. शहर स्वच्छतेच्या बाबतीत महापालिकेने मिळविलेले यश हे सफाई कामगारांच्या कार्याची फलश्रुती आहे. प्रामाणिकपणे कार्य करून आपल्या शहराचा नावलौकिक करणाऱ्या आईवडिलांच्या कार्याचा आदर्श पुढे ठेवून आपले शहर स्वच्छ भारत मिशनमध्ये क्रमांक एक वर यावे, यासाठी त्याच विश्वासाने व प्रामाणिकपणे कार्य करा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी मनपा सेवेत रुजू होणाऱ्या ऐवजदार सफाई कामगारांना केले.

ठळक मुद्देमृत ऐवजदार सफाई कामगारांच्या वारसदारांना ऐवजी कार्ड प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या स्वच्छतेमध्ये सफाई कामगारांचे महत्त्वाचे योगदान आहे. शहर स्वच्छतेच्या बाबतीत महापालिकेने मिळविलेले यश हे सफाई कामगारांच्या कार्याची फलश्रुती आहे. प्रामाणिकपणे कार्य करून आपल्या शहराचा नावलौकिक करणाऱ्या आईवडिलांच्या कार्याचा आदर्श पुढे ठेवून आपले शहर स्वच्छ भारत मिशनमध्ये क्रमांक एक वर यावे, यासाठी त्याच विश्वासाने व प्रामाणिकपणे कार्य करा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी मनपा सेवेत रुजू होणाऱ्या ऐवजदार सफाई कामगारांना केले.मनपा सेवेतील मृत ऐवजदार सफाई कमागारांच्या वारसदारांना बुधवारी महापालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात नंदा जिचकार यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या हस्ते ऐवजी कार्ड प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात आरोग्य समिती सभापती मनोज चापले, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, विभागीय अधिकारी रोहिदास राठोड, राजेश हाथीबेड, एसबीएम विकास संस्थेचे अध्यक्ष सतीश सिरसवान व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.अनेक वर्षांच्या प्रयत्नाला यशऐवजदार सफाई कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची होणारी अवस्था लक्षात घेता त्यांच्या वारसदाराला ऐवजदार सफाई कर्मचारी म्हणून रुजू करावे यासाठी अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रयत्न सुरू होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वेळोवेळी दखल घेतली. प्रशासनातर्फे ही आयुक्तांनी योग्य निर्णय घेऊन हे कार्य पूर्णत्वास नेले व अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आले आहे, असे सांगत सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासह आयुक्तांचेही अभिनंदन केले. ऐवजदार सफाई कामगारांच्या वारसांना सेवेत घेण्यात यावे यासाठी सत्तापक्षातर्फे सभागृहामध्ये भूमिका मांडण्यात आली. येणाऱ्याअडचणी सोडवून प्रशासनाने अखेर सेवेत नियुक्तीचा मार्ग मोकळा केला. शहरात स्वच्छतेबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता सर्वांनी ठरवून दिलेल्या वेळेवर १०० टक्के काम करून कोणत्याही तक्रारीची संधी देऊ नका,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी