शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दहावीनंतर मुलांच्या कामात लुडबूड करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:27 IST

आत्महत्येचा विचार करणाऱ्यांनी किंवा प्रयत्न केलेल्यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास याचा मोठा फायदा होतो. ते या विचारापासून परावृत्त होतात, असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, दहावीनंतर मुलगा सज्ञान होतो. यामुळे त्याच्या दैनंदिन व्यवहारात पालकांनी लुडबूड करू नये, मात्र त्याच्यावर ‘वॉच’ ठेवावा, असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देमानसोपचार तज्ज्ञ जोशी यांचे मत : आत्महत्या करणे एक मोठे गूढ रहस्य

लोकमत न्यूज नेटवर्क नागूपर : आत्महत्या करणे हे एक मोठे गूढ रहस्य आहे. ८५ टक्के आत्महत्या कुठल्या न कुठल्या मानसिक आजारातून होतात, तर १५ टक्के आत्महत्या या नाचक्की, आर्थिक, शैक्षणिक, भीती, लाज आदी कारणाने होतात. मात्र आत्महत्येचा विचार करणाऱ्यांनी किंवा प्रयत्न केलेल्यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास याचा मोठा फायदा होतो. ते या विचारापासून परावृत्त होतात, असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, दहावीनंतर मुलगा सज्ञान होतो. यामुळे त्याच्या दैनंदिन व्यवहारात पालकांनी लुडबूड करू नये, मात्र त्याच्यावर ‘वॉच’ ठेवावा, असेही ते म्हणाले.ऋत्विक बोके या बारावीचा विद्यार्थ्याची आत्महत्या ही त्याच्या कुटुंबीयांनाच नाही तर शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या घरातील कुटुंबीयांना धक्का देऊन गेली. या घटनेला घेऊन डॉ. अविनाश जोशी ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले, आत्महत्येचा विचार येणे म्हणजे, इतरांचा रागावर स्वत:वर काढून स्वत:ला संपवून त्या व्यक्तीला धडा शिकविणे असल्यासारखे असते. ऋत्विक बोकेच्या प्रकरणात सध्याच काही बोलता येणार नाही. परंतु त्याची आत्महत्या ही १५ टक्क्यांमधील कारणामधील एक असावी. काही विद्यार्थी आपल्या मनातील समस्या दुसऱ्यांना सांगत नाही किंवा सांगू शकत नाही. अशा कुढत वावरणाºया विद्यार्थ्यांशी शिक्षक, पालकांनी लगेच हेरून त्याच्याशी संवाद वाढविणे फार महत्त्वाचे ठरते.

  • पालकांनो याकडे लक्ष द्या
  •  आपल्या इच्छा मुलांवर लादू नका
  •  दहावीनंतर त्यांच्या दैनंदिन कामात लुडबूड करू नका, मात्र ‘वॉच’ ठेवा.
  •  मुलाशी सकारात्मक संवाद साधा
  •  त्याच्या करिअरविषयी आस्थेने चौकशी करा
  •  त्याच्या इच्छांना मान द्या
  •  मुलांना अति‘पॉकेटमनी’ देणे टाळा.
  •  मुलाचा विश्वास संपादन करा
  •  दहावीनंतर त्याच्याशी मैत्रीपूर्व व्यवहार ठेवा.
  •  लहानपणापासूनच मुलांना नाही म्हणायला शिका
टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर