मेल, एक्स्प्रेसच्या लोकोपायलटला देऊ नका मालगाड्यांवर ड्युटी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST2021-01-16T04:11:43+5:302021-01-16T04:11:43+5:30
नागपूर : मेल एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस आणि पॅसेंजरच्या लोकोपायलटला मालगाड्यांवर ड्युटी देऊ नका आणि इतर मागण्यांसाठी नॅशनल रेल्वे मजदूर ...

मेल, एक्स्प्रेसच्या लोकोपायलटला देऊ नका मालगाड्यांवर ड्युटी ()
नागपूर : मेल एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस आणि पॅसेंजरच्या लोकोपायलटला मालगाड्यांवर ड्युटी देऊ नका आणि इतर मागण्यांसाठी नॅशनल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने ‘डीआरएम’ कार्यालयासमोर द्वारसभेचे आयोजन करण्यात आले.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्यावतीने द्वारसभेत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्या रेटून धरल्या. यात रनिंग स्टाफला त्रास देणे बंद करावे, रनिंग स्टाफमधील रिक्त जागा पदोन्नतीने भराव्यात, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रनिंग कर्मचाऱ्यांना रेल्वे बोर्डाच्या धोरणाप्रमाणे विशेष सुट्या जाहीर कराव्यात, नवी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना सुरू करावी आदी मागण्या करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी माधुरी उराडे होत्या.
आंदोलनात कार्यकारी अध्यक्ष हबीब खान, विभागीय अध्यक्ष देबाशीष भट्टाचार्य, साजी कोशी, सहायक विभागीय सचिव प्रमोद बोकडे, मुख्यालय सदस्य मनोज चौथानी, नरेंद्र धानफुले, सी. के. शर्मा, नरेंद्र मेश्राम, ए. के. पांडे आदींनी आपले विचार मांडले.
द्वारसभेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध जोरदार नारेबाजी केली. मागण्या त्वरित पूर्ण न केल्यास २२ जानेवारीला विशाल धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. संचालन मनीष बारस्कर यांनी केले.
द्वारसभेला राकेश शर्मा, एल. एम. गुरू, पन्नालाल चुरेंद्र, रवी रंजन, राकेश कुमार, मतीन खान, एस. के. सक्सेना, बी. के. साहु, बी. व्ही. गोखले, पी. मौन, डी. पी. साहु, राजेश सोमेवार, एम. के. मुन, विनोद थोराने, जी. के. नामदेव, संजय किन्हीकर, योगेश अंबादे, अनंत चंद्रागडे, प्रकाश भोयर, जगदीश गोहिते, श्याम तिवारी, एम. पी. सिंह, पवन देशमुख उपस्थित होते.