चर्चा नको, उपाय शोधा
By Admin | Updated: December 18, 2015 03:15 IST2015-12-18T03:15:04+5:302015-12-18T03:15:04+5:30
आज समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या समस्यांवर विविध पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात येतात.

चर्चा नको, उपाय शोधा
भय्याजी जोशी यांची मंत्री-आमदारांना सूचना : शेतकऱ्यांवरील संकट ओळखा, वेळीच सावरा
योगेश पांडे नागपूर
आज समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या समस्यांवर विविध पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात येतात. परंतु चर्चांमध्ये वेळ घालविण्याऐवजी त्याचा उपाय व समाधान शोधणारी मंडळी संघाला उभी करायची आहेत. त्यामुळे समस्या सोडविण्यावर जास्त भर देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेले भाजपचे आमदार व मंत्र्यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. यावेळी जोशी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
आज राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. यामागची मूळ कारणे शोधण्याची आवश्यकता आहे. रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपिकता कमी होत आहे. परंतु अनेक ठिकाणी या खतांची मात्रा वाढविण्यात येत आहे. सध्या स्थिती चांगली नसली तरी सावरण्यासाठी वेळ आहे. जर वेळीच शेतकऱ्यांना सावरण्यात आले नाही तर शेती संपायला वेळ लागणार नाही, असे परखड मत जोशी यांनी व्यक्त केले.
पारंपरिक व जैविक पद्धतीच्या प्रयोगांना प्रोत्साहन द्यायला हवे. शिवाय गोपालनामुळेदेखील शेतकऱ्यांना खत मिळू शकते.
आमदारांना बौद्धिकचर्चा नको, उपाय शोधा
नागपूर : नागपूर : एका गायीपासून पाच एकर शेतीला खत मिळणे शक्य आहे. त्यादृष्टीने प्रयत्न हवेत, असा सल्ला देत असताना गोहत्या बंदीच्या निर्णयाचे भय्याजी जोशी यांनी कौतुकदेखील केले. यावेळी त्यांनी उपस्थित आमदारांना संघविचारांशीदेखील अवगत करून दिले. तसेच प्रश्न विचारण्याचीदेखील संधी दिली.