कोरोनावरील लसीकरणासाठी वर्गणी गोळा करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:07 IST2021-05-11T04:07:51+5:302021-05-11T04:07:51+5:30

केंद्र व राज्य शासनातर्फे लस मोफत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र व राज्य ...

Do not collect subscriptions for corona vaccination | कोरोनावरील लसीकरणासाठी वर्गणी गोळा करू नका

कोरोनावरील लसीकरणासाठी वर्गणी गोळा करू नका

केंद्र व राज्य शासनातर्फे लस मोफत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून विविध केंद्रांमधून मोफत करण्यात येत आहे. लसीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा इतर कोणत्याही खासगी संस्थांनी निधी गोळा करू नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

नागपूर विभागात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ४५ वर्षांवरील नागरिकांना तसेच कोविन ॲपवरील नोंदणी केल्यानंतर १८ वर्षांवरील नागरिकांना नि:शुल्क लस देण्यात येत आहे. यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या केंद्रावर कुठेही शुल्क आकारण्यात येत नाही. लसीकरणासाठी कोणीही निधी गोळा करू नये, असे आवाहन यावेळी डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

कोरोनाबाधित तसेच इतर रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध नोंदणीकृत संस्था, सामाजिक संस्था, खासगी तसेच नोंदणीकृत आस्थापनांकडून आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात येत आहे. या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आहे. अशा कामासाठी गोळा केलेला निधी खर्च करता येऊ शकतो. परंतु लसीकरणासाठी अथवा लस खरेदीसाठी निधी गोळा करू नये. यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे लस उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Do not collect subscriptions for corona vaccination