अधिकाऱ्यांना अतिक्रमण दिसत नाही का ?
By Admin | Updated: November 7, 2016 02:34 IST2016-11-07T02:34:49+5:302016-11-07T02:34:49+5:30
महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाद्वारे दररोज अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाते.

अधिकाऱ्यांना अतिक्रमण दिसत नाही का ?
अधिकाऱ्यांना अतिक्रमण दिसत नाही का ?
कारवाईवर प्रश्नचिन्ह : न्यायालयाच्या आदेशाने अधिकारी संभ्रमात
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाद्वारे दररोज अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाते. एखाद्या भागात कारवाईसाठी पथक पोहचले की, रस्ते व फुटपाथवरील विक्रेते पसार होतात. परंतु पथक फिरताच पुन्हा अतिक्रमण केले जाते. कारवाईचा फेरीवाल्यांवर परिणाम होत नसल्याचे शहरातील चित्र आहे.
उत्साही नेत्यांचे फोन
शहरातील रस्ते व फूटपाथ मोकळे असावे यासाठी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकामार्फत नियमित कारवाई केली जाते. परंतु अनेकदा पथक अतिक्रमण हटविण्यासाठी पोहचताच उत्साही नेते पथकातील अधिकाऱ्यांना फोन करून कारवाई थांबविण्यास सांगतात. त्यामुळे पथकाला कारवाई करता येत नाही. अनेकदा वाहतूक पोलिसांच्या सूचनेवरून कारवाई केली जाते. परंतु कोणत्या विभागामार्फत कारवाई केली जात आहे, अशी विचारणा केली तर पोलीस निरुत्तर असतात.