शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

स्थलांतरित श्रमिकांना धोकादायक प्रवास करू देऊ नका; हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 11:04 IST

स्थलांतरित श्रमिकांना स्वत:चा जीव धोक्यात टाकून प्रवास करू देऊ नका. त्यांना सुरक्षित वाहनांनी व नियमांचे पालन करून निर्धारित ठिकाणी सोडून द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्दे पोलीस आयुक्तांना आवश्यक कारवाई करण्यास सांगितले

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्थलांतरित श्रमिकांना स्वत:चा जीव धोक्यात टाकून प्रवास करू देऊ नका. त्यांना सुरक्षित वाहनांनी व नियमांचे पालन करून निर्धारित ठिकाणी सोडून द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिला. तसेच, स्थलांतरित श्रमिकांचा धोकादायक प्रवास थांबविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आवश्यक कारवाई करावी असे सांगितले.राज्य सरकार स्थलांतरित श्रमिकांना एसटी बसेसने त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडून देत आहे. असे असताना हजारो श्रमिक घरी जाण्याकरिता पायी किंवा ट्रक, ट्रेलर अशा धोकादायक वाहनांतून प्रवास करीत आहेत. तसेच, ते शारीरिक अंतर व अन्य नियमांचे पालन करीत नाहीत. न्यायालय मित्र अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी याकडे लक्ष वेधले असता, न्यायालयाने वरील आदेश दिला. यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित असून त्यावर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने विविध आदेश दिल्यानंतर या प्रकरणावर २६ मे रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर यांनी केंद्र सरकारतर्फे, अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी राज्य सरकारतर्फे, अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी महापालिकेतर्फे तर, अ‍ॅड. नितीन लांबट यांनी रेल्वेतर्फे कामकाज पाहिले.उपलब्ध निधीचा उपयोग करास्थलांतरित श्रमिकांना अन्नधान्य पुरविण्याकरिता राज्य सरकारकडे निधी उपलब्ध आहे. परंतु, त्या निधीचा उपयोग करून श्रमिकांना अन्नधान्य वितरित केले जात नाही असे अ‍ॅड. चव्हाण यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकार उपलब्ध निधीतून स्थलांतरित श्रमिकांना अन्नधान्य वितरित करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.हावडा रेल्वे नवीन वेळापत्रकानुसार१९ मे रोजी नागपूर येथून हावडा येथे जाण्यासाठी निश्चित करण्यात आलेली रेल्वे चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आली आहे. आता या रेल्वेसाठी नवीन वेळापत्रक तयार केले जाणार आहे. त्यानंतर ही रेल्वे नागपूर येथून स्थलांतरित श्रमिकांना घेऊन हावडाकडे प्रस्थान करेल अशी माहिती रेल्वेने न्यायालयाला दिली.श्रमिकांना घरापर्यंत सोडून द्याराज्य सरकार स्थलांतरित श्रमिकांना सध्या त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडून देत आहे. परंतु, अ‍ॅड. चव्हाण यांनी या मजुरांना घरी सोडून देण्याची शक्यता पडताळून पहायला हवी असे न्यायालयाला सांगितले. त्यावर राज्य सरकारने याकरिता विविध परवानगी, खर्च इत्यादीसंदर्भात संबंधित राज्यांनी आपसी सहमतीने निर्णय घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकार या मुद्यावर तातडीने विचार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.शहराबाहेर शेल्टर होमसध्या स्थलांतरित श्रमिकांसाठी शहरात विविध ठिकाणी शेल्टर होम तयार करण्यात आले आहेत. असे शेल्टर होम शहराबाहेरही स्थापन करणे आवश्यक आहे याकडे अ‍ॅड. चव्हाण यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यानंतर राज्य सरकारने या सूचनेवर गांभीर्याने विचार करण्याची ग्वाही न्यायालयाला दिली.नागपुरात येत आहेत श्रमिककोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांवर नागपूर स्थानिक प्रशासन प्रभावी उपाययोजना करीत आहे. त्यामुळे शेजारच्या राज्यातील श्रमिक आकर्षणामुळे नागपूरमध्ये येत आहेत अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने नागपूर स्थानिक प्रशासनाची प्रशंसा केली. ही नागपूरच्या कामाची पावती आहे असे न्यायालय म्हणाले. त्यासोबतच न्यायालयाने आंतरजिल्हा स्थलांतरण थांबवले गेले पाहिजे असेही सांगितले. श्रमिकांची काळजी घेतली जाईल असा विश्वास प्रत्येक जिल्हा प्रशासनाने निर्माण केला तरच हे शक्य आहे असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय