‘फायर सेफ्टी ऑडिट’ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:45+5:302021-04-20T04:08:45+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता वाडी नगर परिषदेने त्यांच्या हद्दीतील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानांना ‘फायर ...

Do a fire safety audit | ‘फायर सेफ्टी ऑडिट’ करा

‘फायर सेफ्टी ऑडिट’ करा

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता वाडी नगर परिषदेने त्यांच्या हद्दीतील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानांना ‘फायर सेफ्टी ऑडिट’ करण्याचे तसेच अग्नी सुरक्षा व्यवस्थेचे प्रमाणपत्र १५ दिवसात नगर परिषद कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संबंधितांची धावपळ सुरू झाली आहे.

वाडी नगर परिषद क्षेत्राची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास आहे. शहरात सार्वजनिक प्रतिष्ठाने, खासगी दवाखाने, बँक, गोडाऊन, खासगी व्यावसायिक प्रतिष्ठाने, खासगी शाळा, कोचिंग क्लासेस व सेंटर, नर्सिंग होम, मनोरंजन केंद्र, व्यापारी संकुल, रेस्टॉरंट, हॉटेल, बीअर बार अशी अनेक प्रतिष्ठाने आहेत. या सर्व मालमत्ताधारकांनी त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांचे महाराष्ट्र राज्य अग्निप्रतिबंधक व जीवन रक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार उचित उपाय करण्याची कारवाई करणे अपेक्षित आहे. त्यांना वर्षभरातून सहा-सहा महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे सेफ्टी फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे.

या अग्निशमन सुरक्षा तपासणी परीक्षणासाठी मुंबईस्थित संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा मुंबईद्वारा अभिकर्ता लायसन्स एजन्सीची नियुक्ती केली आहे. याबाबत वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे.

नगर परिषद क्षेत्रातील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने नगर परिषदने सूचित केलेल्या एजन्सीशी संपर्क करून आपली इमारत व व्वआसायिक प्रतिष्ठाने अग्नी प्रतिबंधक उपाययोजना त्यातील त्रुटी आवश्यक सुधारणा आदी परीक्षण करून निश्‍चित कारवाई पूर्ण करून १५ दिवसाच्या आत या मान्यताप्राप्त एजन्सीद्वारा प्रमाणपत्र प्राप्त करून नगर परिषदेला सादर करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

...

हानी झाल्यास मालमत्ताधारक जबाबदार

फायर सेफ्टी ऑडिट न केल्यास आगीसंबंधित हाेणाऱ्या दुर्घटनेमध्ये प्राणहानी अथवा वित्तहानी झाल्यास संबंधित मालमत्ताधारकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे तसेच अशा प्रतिष्ठानांवर प्रतिबंध लावला जाऊ शकताे, असेही नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, वाडी नगर परिषद क्षेत्रातील बहुतांश व्यावसायिक व सार्वजनिक प्रतिष्ठाने त्यांच्या बिल्डिंग नियमानुसार नियमित फायर ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दुर्घटनेत प्राण व वित्तहानी झाल्यास तोपर्यंत बराच विलंब झालेला असताे. त्यामुळे मालमत्ताधारक व नगरपालिका प्रशासन यांच्यात वाद होतात.

Web Title: Do a fire safety audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.