नियुक्त्यांत पात्रता निकष पाळता का?
By Admin | Updated: July 15, 2014 01:14 IST2014-07-15T01:14:02+5:302014-07-15T01:14:02+5:30
परीक्षा नियंत्रकासारख्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या करताना पात्रता निकष पाळता का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने करून यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर

नियुक्त्यांत पात्रता निकष पाळता का?
हायकोर्टाची विचारणा : विद्यापीठाला मागितले प्रतिज्ञापत्र
नागपूर : परीक्षा नियंत्रकासारख्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या करताना पात्रता निकष पाळता का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने करून यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांच्या रिट याचिकेवर आज, सोमवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, त्यांनी वरील निर्देश दिलेत. परीक्षा नियंत्रकपदासाठी अपात्र ठरविण्याच्या निर्णयाविरुद्ध विलास रामटेके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वादग्रस्त निर्णयावर ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा न्यायालयाचा अंतरिम आदेश आहे. ६ जानेवारी रोजी पुणे येथे सुनावणीची संधी दिल्यानंतर राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. पी.आर. गायकवाड यांनी रामटेके यांना अपात्र ठरविण्याचा उच्च शिक्षण सहसंचालकांचा आदेश नियमानुसार असल्याचा निर्वाळा दिला आहे. यासंदर्भात विद्यापीठाला विस्तृत पत्र पाठविण्यात आले आहे. पुरेसा अनुभव नसताना विलास रामटेके यांची परीक्षा नियंत्रकपदी नियुक्ती करण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनसोड यांनी केली होती. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)