शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

ऑडिट नव्हे, सखोल चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:07 IST

कोरोना महामारीच्या काळात ‘त्या’ विषाणूची बाधा झाल्यापासून ते जीवन-मरणाच्या लढाईत अखेरपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची प्रत्येक गोष्ट एक ...

कोरोना महामारीच्या काळात ‘त्या’ विषाणूची बाधा झाल्यापासून ते जीवन-मरणाच्या लढाईत अखेरपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची प्रत्येक गोष्ट एक आव्हान बनल्याचा अनुभव गेले सव्वा वर्ष आपण घेत आहोत. बाधितांची देखभाल, बेडस्, औषधे, शुश्रूषा, ऑक्सिजन या मालिकेतील नवे आव्हान ‘व्हेंटिलेटर्स’ नावाचे जीवनदायी उपकरण आहे. मुळात देशात सार्वजनिक व खासगी रुग्णालयांमध्ये आधी खाटांची संख्या खूप कमी. व्हेंटिलेटर्सयुक्त खाटा तर आणखी कमी. त्यामुळे श्वास कोंडून मारणारा विषाणू शिरजोर, अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी महामारीच्या सुरुवातीलाच पन्नास हजार व्हेंटिलेटर्स पुरविण्याची घोषणा केली तेव्हा पीएम केअर्स नावाच्या नव्या फंडाबाबत उपस्थित झालेल्या शंकांकडे कानाडोळा करून जनतेने आनंद व्यक्त केला. नरेंद्र मोदी तारणहार ठरले; पण आता वर्षभरानंतर मोठ्या प्रमाणावर हे व्हेंटिलेटर्स कुचकामी असल्याचे, त्यांचा पुरवठा करताना किरकोळ सेन्सर वगैरे देण्यात आलेच नसल्याचे उघड झाले आहे. अगदी भाजपशासित राज्यांमधूनही अशा तक्रारी झाल्या. आधीच विधानसभा निवडणुकीचा प्रचार, कुंभमेळा वगैरे प्रकारांनी कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला गेला असताना हे नवे आरोप झाले. परिणामी, अशा आरोपांना कधी भीक न घालणाऱ्या, विरोधातील नेत्यांच्या पत्रांची, सूचनांची अजिबात दखल न घेणाऱ्या पंतप्रधानांना ऑडिटच्या रूपाने का होईना; पण चौकशीचे आदेश द्यावे लागले आहेत. अवतारी पुरुष मानलेला आपला नेता कधी चुकूच शकत नाही, असा श्रद्धाभाव मनात बाळगणाऱ्या मोदी समर्थकांना हे बऱ्यापैकी निराश करणारे आहे. तरीदेखील पीएम केअर्स फंडाचा, त्यातून पुरविण्यात आलेल्या उपकरणांचा बचाव मोदी समर्थकांकडून केला जातोय, हे अलहिदा.

नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीवेळी जनतेला मदत करण्यासाठी आधीच पंतप्रधान साहाय्यता निधी अस्तित्वात असताना काहीतरी खुसपट काढून पंतप्रधान मोदी यांनी प्राइम मिनिस्टर्स सिटीझन असिस्टंन्स अँड रिलिफ इन इमर्जन्सी सिच्युएशन म्हणजेच पीएमकेअर्स नावाचा हा नवा कोष तयार केला. त्यात अवघ्या आठवडाभरात तीन हजार कोटी रुपये जमाही झाले. त्यातून पन्नास हजार व्हेंटिलेटर्स खरेदीसाठी दोन हजार कोटी, स्थलांतरित मजुरांना सुविधांसाठी एक हजार कोटी खर्च करणार असल्याची घोषणा झाली. त्यानुसार, केंद्र सरकारने दर्जेदार उपकरणे तयार करणाऱ्या एखाद्या बड्या कंपनीला आदेश देऊन तात्काळ पुरवठा करून टाकायला हवा होता. तथापि, तीस हजार व्हेंटिलेटर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही सरकारी कंपनी करणार होती, तर उरलेले वीस हजार व्हेंटिलेटर्स चार खासगी कंपन्यांकडून खरेदीचा निर्णय आरोग्य खात्याने घेतला. खरा घोळ इथेच झाला. मोदीनिष्ठा दाखवताना आरोग्य खात्याने लोकांच्या जीविताशी थेट संबंध असलेल्या या खरेदीतही ‘मेक इन इंडिया’ ही मोदींची चकचकीत घोषणा सिद्ध करण्याचा खटाटोप केला. उत्पादनाचा दर्जा वगैरेचा विचार न करता खासगी उत्पादकांना प्रोत्साहनाच्या नावावर पुरवठ्याचे आदेश निघाले. काही कंपन्यांना त्यासाठी आगाऊ रकमा मिळाल्या, तर काहींना अजूनही त्यांची प्रतीक्षाच आहे. महाराष्ट्रात औरंगाबादच्या शासकीय वैद्यक महाविद्यालयात एका समितीने अशा कुचकामी व्हेंटिलेटर्सबद्दल चाैकशी केली तेव्हा आढळले की गुजरातमधील एका कंपनीने पुरविलेले बहुतेक व्हेंटिलेटर्स वापरण्यासाठी योग्य नाहीतच. या अहवालावर फारशी चर्चा झाली आहे. या व्हेंटिलेटर्सच्या किमतींबाबतही गोंधळ आहे. कमी-अधिक दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या या उपकरणासाठी अगदी १ लाख ४० हजारांपासून १२ लाख ७० हजारांपर्यंत आहेत. अशा कंपन्यांनी बनविलेल्या व्हेंटिलेटर्सचा दर्जा काय असेल, याबद्दल न बोललेलेच बरे. आता देशाच्या कानाकोपऱ्यात दुय्यम दर्जाच्या, ऑक्सिजन सेन्सर व कॉम्प्रेसरचा वारंवार बिघाड होणाऱ्या, तास-दोन तास चालवताच दाब कमी होणाऱ्या व्हेंटिलेटर्समुळे किती जीव गेले असतील, याची कल्पनाही करवत नाही. हा मामला इतका गंभीर असताना देशभरातून ओरड झाल्यानंतर केवळ व्हेंटिलेटर्स उपकरण बसविण्यात व नंतर ते चालविण्यात कुठे चूक वगैरे झाली का एवढ्यापुरतेच ऑडिट करण्याचा आदेश पंतप्रधानांचे कार्यालय देत असेल तर नक्कीच कुठेतरी पाणी मुरते आहे, काहीतरी काळेबेरे आहे. म्हणूनच एकतर हे ऑडिट केंद्र व राज्याच्या संयुक्त यंत्रणेने करायला हवे. त्याचप्रमाणे पीएम केअर्स फंड स्थापन झाल्यापासूनची प्रत्येक खरेदी, निधीचा जमा-खर्च या सगळ्यांचीच सखोल चौकशी व्हायला हवी.

----------------------------------