डीजे मालकाला १० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST2021-04-07T04:09:09+5:302021-04-07T04:09:09+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा/रेवराल : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करण्याबाबत प्रशासनाच्या वतीने वेळावेळी आवाहन केले जाते. मात्र, ...

डीजे मालकाला १० हजारांचा दंड
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा/रेवराल : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करण्याबाबत प्रशासनाच्या वतीने वेळावेळी आवाहन केले जाते. मात्र, काही जण ‘क्या हाेता है’ म्हणत मनमानी करतात आणि ताेंडघशी पडतात. असाच प्रकार माैदा तालुक्यातील खराडा पुनर्वसन (मारोडी) येथे साेमवारी (दि. ५) रात्री घडला असून, प्रशासनाने डीजे व वाहन ताब्यात घेत डीजे मालकाकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
खराडा पुनर्वसन (मारोडी) येथे साेमवारी रात्री स्थानिक रहिवासी बाजीराव ईस्तारी भोयर यांच्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ आयाेजित केला हाेता. त्यात डीजे सुरू असल्याची माहिती पाेलीस व महसूल विभागाला मिळाली हाेती. त्यामुळे या विभागाच्या पथकाने लगेच पाहणी केली. तिथे डीजे सुरू असल्याचे लक्षात येताच या पथकाने डीजे व ते वाहन नेण्यासाठी वापरले जाणारे वाहन सात दिवसांसाठी ताब्यात घेतले असून, डीजे मालक महेश सराटकर, रा. नरसाळा, ता. मौदा याला १० हजार रुपयांचा दंड ठाेठावला व लगेच तो वसूलही केला. एवढेच नव्हे तर, बाजीराव भाेयर यांनाही दाेन हजार रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमात किमान २०० नागरिक सहभागी झाले हाेते. त्यांच्यावर मात्र काेणतीही कारवाई करण्यात आली नाही. प्रशासनाने हयगय करणाऱ्या नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करायला पाहिजे, असे मतही काहींनी व्यक्त केले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक जगदीश बिरोले, हवालदार ओमकार तिरपुडे, उमेश माेहर्ले यांच्यासह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश हाेता.