शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दगडी चाळ पाडण्याआधी ‘डॅडी’ साजरी करणार दिवाळी

By योगेश पांडे | Updated: October 30, 2023 18:08 IST

दसरादेखील यंदा कुटुंबियांसोबतच

नागपूर : शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येच्या प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याची दिवाळीदेखील यंदा मुंबईच्या भायखळ्यातील दगडी चाळीत होणार आहे. विशेष म्हणजे त्याची दगडी चाळीतील ही अखेरची दिवाळी ठरण्याची शक्यता आहे. कारण लवकरच दगडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी पाडण्याच्या हालचाली सुरू आहेत.

१९ ऑक्टोबर रोजी अरुण गवळीची फर्लोवर सुटका झाली होती. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी तो मुंबईत पोहोचला. मुंबईत पोहोचल्या पोहोचल्या त्याने जनसंपर्क सुरू केला. फर्लोवर २८ दिवसांसाठी बाहेर आलेल्या गवळीने दगडी चाळीत नवरात्रोत्सवातदेखील उपस्थित लावली होती व घरी कुटुंबियांसह दसरा साजरा केला होता. या चाळीतील नवरात्रोत्सवाचे पन्नासावे वर्ष होते व त्यामुळेच गवळीने फर्लोसाठी पुर्ण प्रयत्न केले होते. गवळीचे देवी दर्शनाचे फोटोदेखील व्हायरल झाले होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या २८ दिवसांत अरुण गवळीच्या घरी अनेक नियोजित बैठका आहेत. त्यात पुनर्विकास प्रकल्प, बिल्डर, काही राजकीय पदाधिकारी यांच्याशी बैठकांचादेखील समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अरुण गवळी याने फर्लोसाठी नागपूर कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षकांकडे अर्ज सादर केला होता. मात्र, त्याला संचित रजा दिल्यास मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेस धोका निर्माण होऊ शकते, असे कारण देत सुटीचा अर्ज नामंजूर केला. त्यावर गवळीचा आक्षेप होता. कारागृह उपमहानिरीक्षकांचा निर्णय अवैध असल्याचा दावा करीत गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArun Gawliअरुण गवळी