शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दिवाळी आली तरी लोककलावंत उपाशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 05:00 IST

यंदा दिसेल का खडी गंमत, दंडार, शाहिरीचा जल्लोष

  प्रवीण खापरे    लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणाची गती ओसरली असली तरी धास्ती संपली नाही. अनेक क्षेत्र अजूनही टाळेबंदच आहेत. मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून सांस्कृतिक क्षेत्र अनलॉक झाले असले तरी, त्याबाबतचे शासन निर्णय अद्याप स्थानिक यंत्रणांपर्यंत पोहोचले नसल्याचे सांगितले जाते. सांस्कृतिक क्षेत्राला मिळालेली परवानगीही अर्धवट आहे.नाट्यगृह, चित्रपटगृहांना उघडण्याची व मोकळ्या मैदानातील सांस्कृतिक कार्यक्रमांना काही निर्बंधासह मुभा मिळाली, मात्र जत्रा अजूनही टाळेबंदच आहे. जत्रा नाही तर लोककलावंतांना रसिक नाही आणि रसिक नाही तर त्यांचे उत्पन्न नाही. दिवाळी आली तरी लोकांचे उपदेशात्मक मनोरंजन करणारा आणि परंपरा जपणारा लोककलावंत उपाशी असल्याची स्थिती आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात मंडई अर्थात जत्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या जिल्ह्यातील जवळपास लहान-मोठ्या ३०० गावांमध्ये मंडईचे आयोजन होत असते. मंडईत नाटक, शाहिरी प्रयोग, दंडार, खडी गंमत, गायन, नृत्याचे कार्यक्रम होत असतात. सोबतच खरेदी-विक्रीचे स्टॉल्स आणि वेगवेगळ्या व्यंजनांचा माहोल असतो. एकप्रकारे सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित करण्याचे हे या भागातील महत्त्वाचे माध्यम आहे. मात्र यंदा हे सगळे सोहळे रंगणार की नाही, अशी भीती लोककलावंतांमध्ये आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना मिळालेली परवानगी मंडईपर्यंत येऊन अडकली आहे. जोवर मंडईचे आयोजन होणार नाही तोवर लोककलावंतांचे पोट भरणार नाही. 

पाच हजार कलावंत धोक्यातपूर्व विदर्भातील या पाचही जिल्ह्यात ५०० हून अधिक मंडळ आहेत. प्रत्येक मंडळामध्ये १० लोककलावंतांचा भरणा असतो. पावसाळा वगळता वर्षभर ही मंडळ व्यस्त असतात. दिवाळीपासून ते उन्हाळा संपेपर्यंत यांची लगबग असते. मंडईतूनच यांची कला प्रसार पावते आणि आर्थिक उत्पन्न होत असते. मात्र टाळेबंदीमुळे उन्हाळा पार कोलमडला. दिवाळीपासून शासकीय अडचण निपटेल अशी आशा होती, मात्र अजूनही स्पष्टता नाही. मंडईंना आता परवानगी मिळाली नाही तर पाच हजार कलावंत धोक्यात येण्याची शक्यता आहे.रोज कला सादर करावी आणि रोज पोट भरावे, अशी स्थिती या लोककलावंतांची असते. उन्हाळ्यात टाळेबंदी लागू झाली आणि कलावंतांनी मजुरी, भाजीपाला विक्री असे पर्याय निवडले. कलावंतांना अशास्थितीत जगताना बघून डोळे पाणावतात. मंडईंना परवानगी मिळाली नाही तर कलावंत लोककलेपासून विरक्त होण्याची भीती आहे. - शाहीर धर्मदास भिवगडे, अध्यक्ष : विदर्भ शाहीर कलाकार परिषद