शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

दिवाळी २०१८; कानोले, खांडो आणि पुरीचे लाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 11:47 IST

विदर्भाच्या ग्रामीण भागात या सणाला काही खास पारंपारिक पदार्थ केले जातात. त्यात सर्वत्र केला जाणारा पदार्थ म्हणजे, पिठीचे कानोले.

ठळक मुद्देजिला कानोला करता येतो तिला सुगरण समजले जाते

लोकमत न्यूज नेटवर्कडॉ. प्रतिमा इंगोलेनागपूर: दिवाळी हा कृषीप्रधान संस्कृतीतील महत्त्वाचा सण. प्रत्येकाच्या पदरी आनंदाचे चार क्षण टाकणारा. वावरात पऱ्हाटीची रौप्यफुले फुलवणारा. विदर्भाच्या ग्रामीण भागात या सणाला काही खास पारंपारिक पदार्थ केले जातात. त्यात सर्वत्र केला जाणारा पदार्थ म्हणजे, पिठीचे कानोले.दिवाळीच्या आधीपासूनच वऱ्हाडातील खेड्यापाड्यात कानोल्याचा मौसम सुरू होतो. मुख्य म्हणजे हा घरोघरी केला जाणारा पदार्थ सामुहिकरित्या केला जात असतो. ते करणे हे जरा जिकीरीचे काम असते. ओलवलेले गहू दळण्यापासून ते कानोले बनवण्यापर्यंत शेजारापाजारच्या काकू आणि मावश्यांचा हातभार लागतो. हे ओलवलेले गहू दळायला जड असतात. त्यामुळे दुपारच्या वेळी या बायका ते एकमेकींना दळू लागतात. दळण्याचा सोहळा पार पडला की मग सुरू होते त्या पिठाची गाळागाळ. त्यानंतर रवा वेचण्याचा कार्यक्रम. हा रवा वेचणे हे सर्वांना जमत नाही. काही हातच या निष्णात असतात. मग जिला तो चांगला वेचता येतो तिला घरोघरी मानाने बोलावून रवा वेचून घेतला जातो. मग घरची धनीण पिठी भाजून नंतर दळून घेतात. पिठी म्हणजे ओलावलेले गहू दळल्यानंतर ते बारीक पीठ निघते ते. हे पीठ मंदाग्नीवर खरपूस भाजतात. त्यानंतर पुन्हा दळतात. आता या कामात मिक्सरचा वापर केला जातो. पिठी भाजून व पुन्हा दळून झाली की पिठीत पिठीसाखर आणि भरपूर लोणकढे तूप कालवले जाते. त्यात वेलदोड्याची पूड मिसळतात. पिठीला चोळून चोळून तिचा लाडू करता येईल इतपत त्यात तूप घालतात.दळलेल्या ओलवल्या गव्हातील पिठी असे सारणासाठी कामी येते. दळलेला रवा वेचल्यानंतर त्यातून तांब वेगळी काढतात. तांब म्हणझे जाडसर आणि लालसर रवा. उरलेला पांढराशुभ्र व एकसारखा रवा दुधात अथवा पाण्यात सकाळीच थोडे मीठ घालून भिजवून ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवतात. एकदाचे दोन वाजले की बायका आपापले पोळपाट व लाटणे घेऊन जिच्या घरी कानोले करायचेत तिच्याकडे जमतात. मग घरधनीण दगडाच्या लांबट खलबत्त्यात भिजवलेला उंडा कांडायला घेते. इतरजणी सतरंजीवर गोलाकार बसतात. छोट्याशा पातेल्यात पिठी घेतली जाते. मग कार्यक्रम सुरू होतो कानोल्यांच्या निर्मितीचा.लांबट पुरी लाटायची असते. तशी जमणाऱ्या काहीच कुशल स्त्रिया असतात. पातळ काठ आणि मध्यभागी जाड अशा पुऱ्या लाटल्या जातात. मग ती पुरी अंगठ्याजवळच्या बोटावर घेऊन तिच्या कडा चिकटवून तिची खोळ तयार करतात. मग त्या खोळीत भाजलेली पिठी गच्च दाबून भरतात. मग हलक्या हाताने काठ चांगले दाबून सर्व बाजूंनी कानोला सारखा झाला आहे का हे तपासले जाते. मग तो सुपात ठेवला जातो. असे हे कानोले मग तेलात तळले जातात. खूप अलवार मेहनतीने बनलेले हे कानोले तोंडात टाकताच विरघळतात. अमरावती जिल्ह्यात लांबट कानोला करतात. जिला कानोला करता येतो तिला सुगरण समजले जाते.दिवाळीतील दुसरा पारंपारिक पदार्थ म्हणजे खांडो. या प्राचीन पदार्थ आहे. त्याचे आताचे सुधारित रूप म्हणजे शंकरपाळे. पण खांडो अधिक रुचकर लागतात. यात कणकेमध्ये गुळाचे पाणी कालवून घट्ट कणिक भिजवली जाते. ही कणिक तेला किंवा तुपाचा हात लावून चांगली मळली जाते. त्याची पोळी लाटून थोडे मोठे चौकोनी काप करतात. हे काप तेलात तळून घेतात. कणकेमुळे खांडो खुसखुशीत होतात.विदर्भातला तिसरा पारंपारिक पदार्थ म्हणजे पुरीचे लाडू. हे लाडू इतर लाडवांपेक्षा अधिक पौष्टिक असतात. हे करताना किंचित मीठ घालून बेसन भिजवतात. त्याच्या जाड पुºया तळून घेतात. या पुºया गरमगरम असतानाच त्याचा चुरा करायचा असतो. या चुºयाला साखरेच्या किंवा गुळाच्या पाकात घालून त्याचे लाडू वळले जातात.बेसनाच्या कडक पुºया हा पदार्थ अलीकडे दिसत नाही. शेवेच्या आधीचा हा पदार्थ टिकाऊ गुणवत्तेचा आहे. बेसनात ओवा, तिखट, मीठ, हळद टाकून त्याला घट्ट भिजवतात. त्याला बराच वेळ कुटले जाते. मग त्याच्या कडक पुºया तळतात. ही पुरी फुगू देत नाहीत.शेतात जे पिकते त्यातूनच सणवार साजरे करायची जी आधीची पद्धत होती, त्या पद्धतीनुसार गव्हाचा व बेसनाचा जास्त वापर केला जात असल्याचे आपल्या लक्षात येईल.

टॅग्स :Diwaliदिवाळीfoodअन्न