दक्षिण नागपुरात दिव्यांग स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार; नितीन गडकरी यांची घोषणा

By गणेश हुड | Published: February 20, 2023 03:14 PM2023-02-20T15:14:21+5:302023-02-20T15:15:06+5:30

महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग पार्कचे भूमीपूजन

Divyang Sports Complex to be set up in South Nagpur, Nitin Gadkari's announcement | दक्षिण नागपुरात दिव्यांग स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार; नितीन गडकरी यांची घोषणा

दक्षिण नागपुरात दिव्यांग स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार; नितीन गडकरी यांची घोषणा

googlenewsNext

नागपूर : पूर्व नागपुरात सहा महिन्यात महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क उभे राहील. लवकरच दक्षिण नागपुरात दिव्यांगसाठी स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय केंद्रीय रस्ते व वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केली. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत नासुप्रच्या माध्यमातून पूर्व नागपुरातील पारडी परिसरातील सूर्य नगर येथे दोन एकर जागेत  दिव्यांगासाठी उभारण्यात येणाऱ्या अनुभूती इन्क्लुझिव पार्कचे भूमीपूजन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. 

दिव्यांग पार्कच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा  प्रयत्न आहे. या  पार्क मध्ये दिव्यांग तसेच जेष्ठांना आनंद, मनोरंजन, प्रशिक्षण, ब्रेल लिपी अश्या सर्व प्रकारच्या सुविधा राहतील. या प्रकल्पावर १२ कोटी रुपये खर्च येणार आहे.  विदर्भातील पाय नसलेल्या दिव्यांगांना कृत्रिम उपलब्ध करण्याचा मानस नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार कृष्णा खोपडे होते. यावेळी आमदार व भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, आमदार मोहन मते, विकास कुंभारे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन. बी, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

२०० धोबी समाज बांधवांना गॅस इस्त्री देणार

धोबी समाज बांधव कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय करतात.  हा व्यवसाय करणाऱ्या २०० जणांना गॅसवर चालणाऱ्या इस्त्री, सिलेंडर व वाशिंग पावडर   तसेच दिव्यांगांना नागपूर महापालिकेच्या माध्यमातूत १०० ई-रिक्षा वाटप करणार असल्याची  घोषणा नितीन गडकरी यांनी यावेळी केली.

Web Title: Divyang Sports Complex to be set up in South Nagpur, Nitin Gadkari's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.