मनपा सभागृहाबाहेर दिव्यांग व बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 12:11 AM2020-06-21T00:11:51+5:302020-06-21T00:14:58+5:30

स्वयंरोजगार अर्थसाहाय्य योजनेसाठी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांची महापालिकेने फसवूक केली आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतरही स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करण्यास समाजकल्याण विभागातर्फे टाळाटाळ केली जात असल्याच्या विरोधात् दिव्यांगांनी तर मागील तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने मनपाच्या आपली बस कर्मचाऱ्यांनी शनिवारी सुरेश भट सभागृहाबाहेर निदर्शने केली.

Divyang and bus workers' agitation outside the corporation hall | मनपा सभागृहाबाहेर दिव्यांग व बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मनपा सभागृहाबाहेर दिव्यांग व बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वयंरोजगार अर्थसाहाय्य योजनेसाठी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांची महापालिकेने फसवूक केली आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतरही स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करण्यास समाजकल्याण विभागातर्फे टाळाटाळ केली जात असल्याच्या विरोधात् दिव्यांगांनी तर मागील तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने मनपाच्या आपली बस कर्मचाऱ्यांनी शनिवारी सुरेश भट सभागृहाबाहेर निदर्शने केली.


महापालिकेच्या समाजकल्याण विभागामार्फत २०१९-२० या वर्षात दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य योजना राबविण्यात आली. यासाठी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांना आर.एस.ई.टी.आय. प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पात्र ठरलेल्यांना अर्थसाहाय्य मिळावे, अशी मागणी दिव्यांगांनी केली.
आपली बसच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी केली.

मुंढे यांच्या समर्थनार्थ युवक काँग्रेस

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘एकच मुंढे, विरोध करणारे गुंडे’ म्हणत त्यांचे समर्थन केले. मनपा सभा सुरू होण्यापूर्वी सभागृहाबाहेर युवक काँग्रेस तसेच आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या समर्थनार्थ बॅनर झळकावले. काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात हे प्रदर्शन करण्यात आले. शहर युवक काँग्रेस अध्यक्ष तौसिफ खान, अभय रणदिवे, इरफान काजी, अक्षय घाटोळे यांच्यासह पदाधिकाºयांचा समावेश होता. दुसरीकडे सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्या विरोधात भूमिका घेतली. यावरून काँग्रेसमधील दुफळी पुढे आली.

Web Title: Divyang and bus workers' agitation outside the corporation hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.