डब्बा व्यापाराची एसआयटी चौकशी

By Admin | Updated: May 19, 2016 02:36 IST2016-05-19T02:36:05+5:302016-05-19T02:36:05+5:30

डब्बा व्यापार प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस प्रशासनाने स्पेशल इन्व्हेस्टिगेटीव्ह टीम (एसआयटी) गठित केली आहे.

DIT Business SIT inquiry | डब्बा व्यापाराची एसआयटी चौकशी

डब्बा व्यापाराची एसआयटी चौकशी

सध्या सीबीआयला प्रकरण सोपविलेले नाही : तपासात बाहेरच्या संस्थांची मदत घेणार

नागपूर : डब्बा व्यापार प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस प्रशासनाने स्पेशल इन्व्हेस्टिगेटीव्ह टीम (एसआयटी) गठित केली आहे. यात तपासाशी संबंधित असलेले वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. चौकशीसाठी लेखा परीक्षक, आयकर विभाग, शेअर मार्केटमधील तज्ञांसह इतर संबंधित संस्थांची मदत सुद्धा घेतली जाईल. आजार जुना आहे. त्यामुळे त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती संयुक्त पोलीस आयुक्त राजवर्धन यांनी दिली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात नागपूर पोलीस पूर्णपणे सक्षम असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बुधवारी सायंकाळी गुन्हे शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सीबीआयकडून चौकशी करण्याच्या प्रश्नावर राजवर्धन म्हणाले, याबाबत राज्यसरकारच निर्णय घेऊ शकते. परंतु एसआयटी यासाठी सक्षम आहे. डब्बा व्यापार कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे. यात कुठल्या प्रकारची ‘मोडस अप्रेंडी’चा उपयोग केला गेला. किती चल अचल संपत्ती जमविली गेली. आदी अनेक बाबींवर तज्ञांची मदत घेत तपासात पुढे जाऊ. नुकत्याच झालेल्या धाडीनंतर अटक झालेल्या आरोपींचा पीसीआर वाढविण्यासंबंधी त्यांनी सांगितले की, तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना जर अतिरिक्त विचारपूस करायची असेल आणि त्यांना आरोपींची कोठडी आणखी काही दिवस वाढवायची असेल तर ते तशी कारवाई करू शकतात.
डब्बा व्यापारातील आरोपी रवी अग्रवाल याचे काही पोलीस अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधांबाबत विचारले असता, आरोपी पकडले गेल्यावर विचारपूस केली जाईल. या आधारावर निष्पक्षपणे कारवाई केली जाईल. फोन कॉल्स, आर्थिक व्यवहारासह विविध बाबींच्या चौकशीबाबत त्यांना विचारले असता राजवर्धन यांनी सांगितले की, चौकशीची संबंधित माहितीचा सध्या खुलासा करता येऊ शकत नाही. चौकशीसोबतच आरोपींचे बँक अकाऊंट गोठविले जाऊ शकतात.
डब्बा व्यापाराशी संबंधित लोकांनी काळा पैसा दुप्पट, तिप्पट करण्यासाठी व्यवस्थेला मात देत कसा व्यवसाय केला. ब्लॅक मनीला धंद्यात लावणारे कोण आहेत, याचा पत्ता लावला जाईल. हा व्यापार देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. ईडी (प्रवर्तन निदेशालय) आणि इतर संबंधित संस्थांसोबत पोलीस माहिती एकत्र करीत आहेत. (प्रतिनिधी)
वरिष्ठ अधिकाऱ्यांची चमू
डब्बा व्यापाराची चौकशी करण्यासाठी गठित एसआयटी ही पोलीस उपायुक्त रंजनकुमार आणि दीपाली मासिरकर यांच्या देखरेखेखाली काम करेल. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील हे या चमूचे नेतृत्व करतील. त्यांच्या नेतृत्वाखील सुद्धा अनेक वरिष्ठ व अनुभवी अधिकारी व कर्मचारी काम करतील.

आर्थिक गुन्हे प्रकरणात पोलीस कमजोर
पोलीस विभागात आर्थिक गुन्हे शाखा आहे. परंतु या शाखेत फाईल आणि आकडे नोंदविण्यापलीकडे फारसे काम होताना दिसून येत नाही. पोलिसांची ही शाखा सक्षम असती तर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या धंद्याची त्यांना आजवर माहिती का मिळाली नाही. पोलिसांकडे आर्थिक क्षेत्राशी संबंधित तज्ञ नसल्याची बाब राजवर्धन यांनी मान्य केली. अशा प्रकरणात बाहेरील तज्ञांची मदत घेतली जाते, असेही त्यांनी सांगितले.

समर्पण शक्य
नुकत्याच झालेल्या काही जणांच्या अटकेनंतर डब्बा व्यापारात काही नावं पुढे आली आहेत. त्यामुळे अनेक आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. सूत्रानुसार पाेिलसांचा फास आवळला जात असल्याने काही व्यापारी समर्पण करीत शरण येऊ शकतात. यानंतर अनेक नवीन पुरावे भेटू शकतात. देशात या व्यापाराचे मोठे जाळे पसरले असल्याचेही सांगितले जाते.

Web Title: DIT Business SIT inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.