जिल्हा काँग्रेस सेवादलाकडून महात्मा फुले यांना आदरांजली ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:04 IST2020-11-29T04:04:47+5:302020-11-29T04:04:47+5:30
नागपूर : नागपूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. कॉटन मार्केट येथे असलेल्या ...

जिल्हा काँग्रेस सेवादलाकडून महात्मा फुले यांना आदरांजली ()
नागपूर : नागपूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. कॉटन मार्केट येथे असलेल्या पुतळ्यासमोर हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष प्रवीण आगरे होते. त्यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. सर्व उपस्थितांनीही पुष्पांजली वाहिली. यावेळी अशोक पालीवाल, राजेंद्र भोंडे, चिंतामण तिडके, सतीश तलवारकर, धनराज चरडे, लक्ष्मण बागडे, सोहन सातपुते, मुरलीधर सोनवणे, सीमा चंद्रिकापुरे, नर्मदा डहाके, अरुण अनासाने, कल्पना बांगरे, मचिंद्र जीवने, चंद्रनाथ भागवतकर, जानकी बारापत्रे आदी प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.