शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या सुविधांची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 13:41 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शहरातील १५ सरकारी इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी नियमानुसार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे.

ठळक मुद्दे१५ सरकारी इमारतींमध्ये द्याव्या लागतील सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शहरातील १५ सरकारी इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी नियमानुसार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी मंगळवारी यासंदर्भात निर्देश जारी करून संबंधित जनहित याचिका निकाली काढली.सरकारी इमारतींमध्ये दिव्यांगांना पोर्टेबल रॅम्प, हॅन्डरेल, ट्रॅक टाईल्स पाथ, व्हील चेअर्स, स्वतंत्र पार्किंग, स्वच्छतागृहे, लिफ्ट इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु, शहरातील रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, जलप्रदाय कार्यालय (पटवर्धन शाळेजवळ), विभागीय निबंधक कार्यालय (भांडे प्लॉट ), डाक कार्यालय (शंकरनगर), केंद्रीय अ‍ॅगमार्क कार्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू कार्यालय, उप-निबंधक कार्यालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, महावितरण कंपनी कार्यालय, विधी महाविद्यालय, तंत्र शिक्षण विद्यालय, मुख्य वन संरक्षण कार्यालय, प्रत्यक्ष कर अकादमी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल व कर निर्धारण कार्यालय (हिवरीनगर) या इमारतींमध्ये संबंधित सुविधांचा अभाव आहे. या इमारतींमध्ये दिव्यांगांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध होतील याची खात्री करून घेण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांवर आली आहे.संबंधित जनहित याचिका इंद्रधनू या सामाजिक संस्थेने दाखल केली होती. या मुद्यावर दाखल केलेली ही दुसरी जनहित याचिका होती.सार्वजनिक इमारतींमध्ये दिव्यांगांना एक वर्षात नियमानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, नवीन इमारतींना नियमाधीन राहूनच परवानगी देण्यात येईल आणि महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या, पण इतरांच्या मालकीच्या इमारतींमध्ये संबंधित सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगू, अन्यथा कारवाई करू अशी ग्वाही राज्य सरकार व महानगरपालिकेने न्यायालयाला दिल्यानंतर संस्थेची पहिली जनहित याचिका निकाली काढण्यात आली होती.परंतु, परिस्थितीत समाधानकारक बदल घडला नाही. त्यामुळे संस्थेने दुसऱ्यांदा न्यायालयात धाव घेतली होती. संस्थेतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर तर, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Divyangदिव्यांग